शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

मुल्याधिष्ठीत समाज निर्मिती हेच वारकरी संप्रदायाचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 11:13 IST

राज्यस्तरीय वारकरी संमेलन : अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांचे प्रतिपादन

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऋुषी मुनींच्या काळापासून चालत आलेले विचारांचे अधिष्ठान व संतांची परंपरा ही केवळ भक्ती मार्गानेच नव्हे तर समाजाच्या सर्वागीन विकासाचा दृष्टीकोण समोर ठेवून मुल्याधिष्ठीत समाज निर्मितीसाठी प्रय} करणे हेच खरे वारकरी संप्रदायाचे कार्य आहे. संतांचे विचार हे कुणाही एका जाती धर्मासाठी नाही. ते पूर्वापारपासून पुरोगामीच असल्याचा दावाही अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केला.नंदुरबार येथे शुक्रवारपासून राज्यस्तरीय वारकरी संमेलन व किर्तन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या संमेलनासाठी अखिल भारतीय वारकरी संप्रदयाचे अध्यक्ष बोधले महाराज उपस्थित आहेत. संमेलन व वारकरी संप्रदायाचा एकुणच भुमिकेबाबत ‘लोकमत’शी बोलतांना त्यांनी सांगितले, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. प्रत्येक गावागावात ते रुजले आहे. संतांचे विचार समाजार्पयत पोहचविण्यासाठी किर्तन हे सर्वात चांगले माध्यम आहे. किर्तनातून केवळ धार्मिक विचार मांडले जात नाही. तर त्यात आता सामाजिक मुल्यांची रुजवन केली जाते. पर्यावरण, कुपोषण, बेटीबचाव, जलसंधारण, स्वच्छता यासारखे विविध विषय देखील किर्तनाच्या माध्यमातून जनमानसात पोहचवले जात आहेत. शासनाचा देखील हे आता ध्यानी आल्याने वारकरी संप्रदायाला शासनाचेही प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे गावागावात विखुरलेला वारकरी संप्रदायाला संगठीत करण्यासाठी 2003 मध्ये आपण प्रयत्न केला आणि त्यातूनच अखिल भारतीय वारकरी संप्रदायाची बांधणी झाली. या संघटनेला समाजातून कसा पाठबळ मिळतो ते अनुभवण्यासाठी तुकाराम महाराजांच्या जन्म शताब्दी निमित्ताने देहू येथे पहिले वारकरी संप्रदायाचे संमेलन भरवले. विशेष म्हणजे या संमेलनात एक लाख, चार हजार चारशे वारकरी पारायणाला बसले होते. व इतर तीन ते चार लाख भाविकांची उपस्थिती होती. वारक:यांचा हा प्रतिसाद आनंद देणारा होता. त्यातूनच संमेलनाची परंपरा कायम सुरू केली. पुढे आळंदी येथे हे संमेलन झाले. तेथेही लाखाच्या संख्येत वारक:यांची उपस्थिती होती. गेल्यावर्षी दिल्लीला हे संमेलन घेतले. या ठिकाणी फारसे नियोजन नसतांनाही महाराष्ट्रीयन लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता या वर्षी नंदुबार येथे मुद्दामहून हे संमेलन घेतले आहे. कारण संतांची शिकवण आहे उपेक्षीत घटक जेथे जास्त तेथे काम करावे. या भागात संत विचार पोहचले असले तरी ते व्यापक स्तरावर पोहचावे व विशेषत: त्या माध्यमातून सामाजिक मुल्यांची जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. या भागात कुपोषणासारखा गंभीर प्रश्न आहे. पण कुपोषण केवळ जेवन न मिळाल्यानेच होते असे नाही, त्याला अनेक कारणे आहेत. त्याचेही प्रबोधन आवश्यक आहे. केवळ मानसांचेच नव्हे तर जमिनीचेही कुपोषण होत आहे. या जमिनीला सुपीक करण्यासाठी काय केले पाहिजे त्याचेही प्रबोधन होणार आहे. सात दिवस विविध विषय घेवून हे संमेलन चालेल. या संमेलनात महाराष्ट्रभरातून वारकरी संप्रदाय सहभागी होणार  आहे.