शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात दीड लाख कुटुबांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:52 IST

‘नरेगा’ : तीन वर्षाची आकडेवारी, वर्षात मजुरीपोटी 110 कोटींची रक्कम अदा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगार हमी योजनेतून (नरेगा) गेल्या तीन वर्षात 1 लाख 47 हजार 371 कुटुंबियांच्या हाताला  काम मिळाले आह़े त्याच प्रमाणे या कुटुंबियांसाठी 110 कोटी 66 लाख रुपयांची रक्कम मजुरीपोटी अदा करण्यात आली आह़े एकीकडे अकुशल निधी खर्च होत असताना दुसरीकडे मात्र कुशल निधीसाठी जिल्हा प्रशासनाला अद्यापही प्रतिक्षा करावी लागत असल्याची माहिती आह़ेया योजनेअंतर्गत वर्षातील 100 दिवस केंद्र सरकारतर्फे तर उर्वरीत 265 दिवस राज्य सरकारतर्फे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात असतो़ पूर्वी या कामासाठी प्रतिव्यक्ती 192 रुपये मजुरी दिली जात होती़ परंतु आता ती वाढवून 201 रुपये करण्यात आली आह़े दरम्यान, नरेगाअंतर्गत 2015-2016 मध्ये 4 हजार 610, 2016-2017 मध्ये 4 हजार 548 तर 2017 च्या नोव्हेंबर्पयत एकाच वर्षी तब्बल 9 हजार 950 अशी एकूण 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़दीड लाख कुटुंबियांच्याहाताला कामयोजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दीड लाख कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े 2015-2016 वर्षात 47 हजार  823, 2016-2017 वर्षात 55 हजार 87 तर नोव्हेंबर 2017 र्पयत 44 हजार 461 कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े त्याच प्रमाणे वरील वर्षात अनुक्रमे 37 कोटी 72 लाख, 46 कोटी 57 लाख व 26 कोटी 37 लाख असा एकूण 110 कोटी 66 लाख रुपयांचा अकुशल निधी मजुरीपोटी वाटप करण्यात आला आह़े नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात मजुरांमध्ये बेरोजगारीची मोठी समस्या आह़े त्यामुळे अशांना जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन    करुन त्याना रोजगार हमी योजनेबाबत माहिती दिली जात़े त्याच प्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध करुन अकुशल निधीचे मजुरीपोटी वाटप करण्यात येत असत़े ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात मजुरांचे मार्गदर्शनाअभावी स्थलांतर होत असत़े मजुरांचे गुजरात, मध्यप्रदेशात रोजगारासाठी होणा:या स्थलांतरात मोठी वाढ झाली आह़े त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक परिसरातच रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आव्हाण जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आह़े जिल्ह्यात मजुरीचा प्रश्न गेल्या काही वर्षात वाढत आह़े कुटुंबियांना आपला घराचा गाडा ओढतांना मोठय़ा प्रमाणात कसरत करावी लागत असत़े परंतु गेल्या जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्याने नरेगांतर्गत हाताला काम मिळू लागले असल्याने  स्थानिक मजुरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े मागेल त्याला  काम या तत्वावर मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन सकारात्मक भुमिका                    पार पाडत असल्याचे दिसून येत            आह़े गेल्या तीन वर्षात योजनेअंतर्गत 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़ त्यात विविध रस्ते, सिंचन विहिरी, शौचालये आदींचे कामे पूर्णत्वास येत असतात़ नरेगासाठी केंद्र व राज्य असे दोन्ही सरकारांकडून ठरविक दिवसांच्या रोजगारापोटी असलेल्या निधीची तरतुद करण्यात आले आह़े परंतु काही प्रमाणात केंद्राकडून निधी येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़