शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

11 लघुप्रकल्पांचे कामही पूर्णत्वाकडे

By admin | Updated: March 17, 2017 00:20 IST

देहलीचे काम वर्षभरात : धनपूर व पिंप्राणीचीही घळभरणी

नंदुरबार : लघु पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत 11 प्रकल्पांची कामे पूर्ण झालेली आहेत. त्यातील धनपूर व पिंप्राणी प्रकल्पाची घळभरणी येत्या पावसाळ्याच्या आधी पूर्ण करण्यात येणार आहे. मध्यम प्रकल्पांतर्गत देहली प्रकल्पाची घळभरणीदेखील यंदाच करण्याचे नियोजन आहे. मार्च 2018 र्पयत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जोशी यांनी दिली.ह्यलोकमतह्ण संवाद उपक्रमाअंतर्गत बोलताना ते म्हणाले, नंदुरबार तालुक्यातील बिलाडी प्रकल्पाची उंची दीड मीटरने कमी करण्यात आली आहे. तसा नवीन सुधारित आराखडाही मंजूर झाला आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्र कमी होणार आहे. परिणामी पुनर्वसन टळले आहे. माती धरणाऐवजी आता काँक्रिटीकरणाला प्राधान्य राहणार आहे. खासगी जमीनदेखील वाटाघाटीने खरेदी करण्याचे प्रस्तावित असून महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शिवण प्रकल्पातील 24.19 दशलक्ष घनमीटर पाणीसाठय़ापैकी पाच दशलक्ष घनमीटर पाणीसाठा हा नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव आहे. सध्या 17 ते 18 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या प्रकल्पात आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी देण्यासंदर्भात अडचणी नसल्या तरी पिण्याच्या पाण्यालाही प्राधान्य राहणार आहे.सुसरी, दरा प्रकल्पाच्या पाटचारींचे काम निम्मे झाले आहे. निम्मे काम हे आता भूमिगत पाईपलाईनद्वारे करण्यात येणार आहे. आमलीबारी , रापापूर या धरणांच्या फाउंडेशनचे नवे डिझाईन तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.