शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीतच चटका देणारे ऊन, यंदा उन्हाळा लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा फेब्रुवारी महिना संपण्या आधीच चटका देणारे ऊन पडू लागले आहे. तापमान देखील ३६ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा फेब्रुवारी महिना संपण्या आधीच चटका देणारे ऊन पडू लागले आहे. तापमान देखील ३६ अंशापर्यंत जात आहे. रात्री गारवा आणि दिवसा उकाडा असे विषम पद्धतीचे वातावरण सध्या जिल्हावासी अनुभवताहेत. दरम्यान, यंदा थंडीचे आगमन उशीराने होऊन लवकर थंडी गेल्याने रब्बी पिकांच्या उत्पादकतेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.ऋतूचक्र बदलू लागले आहे. प्रत्येक ऋतू कधी एक महिना उशीरा किंवा दोन ते तीन आठवडे आधी सुरू होत आहे. गेल्या काही वर्षात पावसाळ्याचे मुख्य दिवस हे जुलै ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा असे राहिले आहेत. उन्हाळ्याचे दिवस देखील वाढत आहेत. गेला पावसाळा हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होता.तापमानाचा पारा चढतोय...गेल्या दोन आठवड्यापासून थंडीचे प्रमाण अगदीच कमी झाले आहे. रात्री गारवा राहत असल्यामुळे किमान तापमान १८ ते २० पर्यंत राहत आहे. परंतु दिवसा कडक ऊन पडत असून उकाड्यालाही सुरुवात झाल्याने दुपारचे तापमान ३५ ते ३७ अंशापर्यंत जात आहे. शनिवारचे तापमान ३६.३ अंश नोंदविले गेले आहे. येत्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मार्च महिना सुरू होण्याच्या आधीच तापमान ३७ ते ३८ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ३६ अंशापेक्षा अधीक तापमान असणाऱ्या काही शहरांमध्ये नंदुरबारचाही समावेश झाला आहे.दरवर्षी साधारणत: होळीपर्यंत थंडीचा गारवा राहत असतो. यंदा मात्र त्याआधीच थंडी गायब झाली आहे. वास्तविक यंदा धरणे भरलेली आहेत. छोट्या, मोठ्या तलावांमध्येही काही अंशी पाणी आहे. काही ठिकाणी झरे अजूनही सुरू आहेत. हिरवळही बºयापैकी आहे. असे असतांना यंदा थंडीचे दिवस जास्त राहतील अशी अपेक्षा असतांना झाले मात्र उलटेच.रब्बीवरही परिणामरब्बीच्या गहू व हरभरा पिकांना थंडीची आवश्यकता असते. यंदा अपेक्षीत थंडीच पडली नसल्यामुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. आधीच अवकाळी पावसामुळे उशीराने रब्बी हंगाम सुरू झाला. मार्चपर्यंत रब्बी हंगाम लांबणार हे अपेक्षीत होते. परंतु थंडीच नसल्यामुळे गहू आणि हरभरा यांना फटका बसला आहे. सध्या ही दोन्ही पिकं परिपक्वझाली आहेत.साथीचे आजारवारंवार बदलणाºया वातावरणामुळे साथीच्या आजारांचीही लागण सुरू आहे. संसर्गजन्य आजारांमध्ये सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी या आजारांचे रुग्ण सध्या वाढले आहेत. खोकल्याची साथ गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे.४गेल्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा तब्बल ४४ अंशावर गेला होता. दरवर्षी तापमानातील वाढ नोंदविली जात आहे.४वातावरणातील बदलांमध्ये नंदुुरबार जिल्हा हा संवेदनशील घोषीत करण्यात आलेला आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने आधीच उपाययोजना योजने आवश्यक आहे.४तापमान नियंत्रीत राहावे, पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा यासाठी शतकोटी वृक्ष लागवडीअंतर्गत लाखो वृक्ष लागवड झाली, परंतु त्यांचे जतन आणि संवर्धन होऊ शकले नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे याबाबत सर्वत्रच उदासिनता आहे.