न्याहली : सरपंच ते जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेर्पयत सर्वच प्रमुख पदांवर महिलांची नियुक्ती झाल्याने न्याहली ता़ नंदुरबार येथे महिलाराज सुरु आह़े गावात पोलीस पाटीलपदी महिलेची नियुक्ती झाल्याने हे वतरुळ पूर्ण झाले होत़े संपूर्ण महिलाप्रमुखांच्या उपस्थितीत येथे गुरुवारी ग्रामसभा घेण्यात आली़ यावेळी महिलांनी ग्रामस्थांसाठी विविध विषयांवर चर्चा करत विकास घडवण्यासाठी बाध्य असल्याचे सांगितल़ेन्याहली येथे नुकतेच पोलीस पाटीलपदी प्रतिभा संदीप माळी यांची नियुक्ती करण्यात आली आह़े तत्पूर्वी गावात सरपंचपदावर शालिनी सदानंद पाटील, ग्रामसेविका एस़एस़चव्हाण, तलाठी अमिता साबळे, पंचशिल माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी पाटील, आरोग्य सेविका केदार तर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पदावर कविता चत्रेकर ह्या काम पाहत आहेत़ एखाद्या गावात सर्वच प्रमुख पदांवर महिला कार्यरत असल्याचे हे जिल्ह्यात एकमेव उदाहरण असल्याची माहिती आह़े गुरुवारी सर्व महिला प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेस माजी सरपंच सदानंद पाटील, जयराम माळी, पंढरीनाथ माळी, अशोक पाटील, शांतीलाल मिस्तरी, रविंद्र माळी, संदीप माळी, चतुर माळी, पितांबर माळी, मुरलीधर मिस्तरी, दौलत थोरात, संतोष माळी, प्रमोद माळी, भाऊसाहेब माळी, भरत माळी, सुभद्रा माळी, कमलबाई माळी, विजया माळी, मिराबाई माळी, रेखा माळी, हिराबाई माळी, जसोदा माळी आदी उपस्थित होत़ेसभेत गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेला महिनाभरात कार्यान्वित करणे, जीआयडीपी आरखडा तयार करणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ड यादीतील 125 लाभार्थीची माहिती आवास अॅपमध्ये भरणे, रोहयो कामांची मागणी करण्याचा ठराव करण्यात येऊन स्वयंसहाय्यता बचत गटांचा आढावा घेण्यात आला़ सभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ माळी यांची फेरनिवड करण्यात आली़ रोजगार सेवक पदावर जगन्नाथ माळी यांची निवड करण्यात आली़ मुख्याध्यापिका कविता चत्रेकर यांनी गोवर- रुबेला लसीकरणाबाबत माहिती दिली़ आभार ग्रामसेविका चव्हाण यांनी मानल़े
न्याहली गावात सर्वच प्रमुखपदांवर महिलांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:47 IST