दारुबंदीसाठी महिलांनी खोचला पदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:07 PM2019-12-04T12:07:18+5:302019-12-04T12:07:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. समशेरपूर ता. नंदुरबार येथील अशाच परिस्थितीवर ...

Women lose money for drunkenness | दारुबंदीसाठी महिलांनी खोचला पदर

दारुबंदीसाठी महिलांनी खोचला पदर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. समशेरपूर ता. नंदुरबार येथील अशाच परिस्थितीवर मात करण्यासाठी दारुबंदी होणे अत्यावश्यक होते. परंतु प्रत्यक्ष दारुबंदीसाठी कुठलाही घटक पुढे आला नाही. अशातच तेथील महिलांनी ग्रामसभेचा ठराव करीत दारुचा अवलंब करणाऱ्यांना दंड आकारण्याचा निर्णय घेतला.
समशेरपूर या गावात दारुमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात तरुण पौढ व्यक्तींसह तरुण मंडळीही दारुच्या व्यसनात गोवले गेले. त्यामुळे तेथे कमालीची बेकारी निर्माण झाली. व्यसन करणाऱ्यांपाठोपाठ त्यांचे कुटुंबिय व गावातील प्रत्येकाला त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे तेथील दारुविक्रीवर बंदी आणणे अत्यावश्यक बनले होते. परंतु प्रत्यक्ष दारुबंदीसाठी तेथील कुठलाही घटक पुढे येत नव्हता. परिणामी तेथील बेकारी व समस्यांममध्ये दुपटीने भर पडत होती. यावर मात करण्यासाठी अखेर तेथील बचत गटाच्या महिलांनीच पुढाकार घेतला. अखेर त्यांनी ग्रामसभा घेत काही ठराव मंजूर करुन घेतले.
दारु विक्री करणारे व दारुचे व्यसन करणाºयांविरुद्ध बचत गटाच्या महिला उभ्या राहिल्या असल्या तरी ही बाब अवघ्या गावाच्या हितासाठीच असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे गावातील मोठ्या समस्यांवर मात करता येणार असल्यामुळे या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. महिलांनी घेतलेल्या या निर्णयाचे पोलीस प्रशासनासह विविध प्रशासकीय पातळीवरुनही कौतुक करण्यात येत आहे. हा आदर्श अन्य काही गावांमधील महिलांनी देखील घ्यावा, असे म्हटले जात आहे.

दारु पिणाºयाला- १० हजार दंड
दारु विक्रेत्याला- २० हजार दंड
तीन कि.मी.च्या आत दारु तयार करणाºयाला- ५० हजाराचा दंड
दारुची माहिती देणाºयाला- पाच हजाराचे बक्षीस

Web Title: Women lose money for drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.