शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाखाली दाबली गेल्याने महिला ठार : घोटाणे गावाजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 17:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोंडाईचा येथील आठवडे बाजारासाठी जाणा:या महिलेचा  तीनचाकी रिक्षाखाली दाबल्या गेल्याने मृत्यू झाला़ ही घटना गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घोटाणे गावाजवळ घडली़  घोटाणे ता़ नंदुरबार येथील रजूबाई बन्सीलाल गोसावी ह्या दोंडाईचा येथील आठवडे बाजारात जाण्यासाठी गावातूनच जाणा:या एमएच 39-1481 या रिक्षात बसल्या होत्या़ रिक्षात गावातील चार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोंडाईचा येथील आठवडे बाजारासाठी जाणा:या महिलेचा  तीनचाकी रिक्षाखाली दाबल्या गेल्याने मृत्यू झाला़ ही घटना गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घोटाणे गावाजवळ घडली़  घोटाणे ता़ नंदुरबार येथील रजूबाई बन्सीलाल गोसावी ह्या दोंडाईचा येथील आठवडे बाजारात जाण्यासाठी गावातूनच जाणा:या एमएच 39-1481 या रिक्षात बसल्या होत्या़ रिक्षात गावातील चार ते पाच प्रवासी होती़ ही रिक्षा दोंडाईचाकडे जात असताना घोटाणे गावाजवळील खडक्या नाला फरशी जवळ पुढे चालणा:या ट्रकला ठोकली गेली़ यात ट्रकच्या मागील बंपरमध्ये अडकल्याने रिक्षा रस्त्याच्याकडेला उलटली़ यात रिक्षा बसलेल्या रजूबाई गोसावी ह्या दाबल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला़ नंदुरबार ते दोंडाईचा मार्गावर सध्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आह़े रिक्षा चालक मनोज गोसावी याने खोदकाम झालेल्या भागातून रिक्षा चालवल्याने त्याचे नियंत्रण सुटून रिक्षा ट्रकवर आदळली होती़ महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती घोटाणे गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती़ यामुळे किमान तीन तास नंदुरबार-दोंडाईचा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ याबाबत धनराज हिमंतगीर गोसावी यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून रिक्षाचालक मनोज भिका गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े