शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

लाकूड घेतल्याने महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तलाईचा मालपाडा येथील महिलेचा लाकूड घेतल्याच्या वादातून एकाने खून केल्याची घटना १४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील तलाईचा मालपाडा येथील महिलेचा लाकूड घेतल्याच्या वादातून एकाने खून केल्याची घटना १४ डिसेंबर रोजी घडली होती़ याप्रकरणी १६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला़संगीता किशन पाडवी (३०) असे मयत महिलेचे नाव असून त्या तलाईचा मालपाडा येथील रहिवासी होत्या़ १४ डिसेंबर रोजी संगीता पाडवी ह्या असली गावच्या डोंगरालगत सत्या दवल्या वसावे याच्या शेतात लाकडे तोडण्यासाठी गेल्या होत्या़ याठिकाणी त्या शेतातून लाकडे गोळा करत असताना सत्या वसावे याने येऊन वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ यातून घाबरलेल्या संगीताबाई ह्या घराकडे परतत होत्या़ परंतू लाकूड तोडल्याचा राग मनात धरत सत्या वसावे याने महिलेचा पाठलाग करत असली गावाच्या गुहार डोंगराच्या उतारावर गाठून मारहाण करण्यास सुरुवात केली होती़ यादरम्याने त्याने संगीताबाई यांच्या डोक्यात थेट दगड घातला होता़ यातून त्यांच्या डोळ्यासह डोक्यात गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला होता़ यातून जखमी संगीताबाई यांचा मृत्यू झाला होता़ घटनेची वाच्यता होऊ नये यासाठी संशयित सत्या वसावे याने दगड फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता़ या प्रकारानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता़ मयत महिलेच्या महिलेच्या पतीसह कुटूंबियांनी तिचा शोध सुरु केल्यानंतर ती मयतावस्थेत आढळून आली होती़याबाबत सोमवारी किसन पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित सत्या वसावे याच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तातडीने अटक करण्यात आली़