शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातच काँग्रेस-शिवसेना युतीत नाराजीचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 13:04 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षीच झालेल्या नंदुरबार पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस व शिवसेना युतीच्या ‘नंदुरबार ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षीच झालेल्या नंदुरबार पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस व शिवसेना युतीच्या ‘नंदुरबार पॅटर्न’ची राजकीय चर्चा महाराष्ट्रात सर्वदूर कौतूकाचा विषय ठरली असताना वर्षभरातच या युतीत नाराजीचे सूर व्यक्त होत आहेत़ शनिवारी झालेल्या उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडीच्या बैठकीत शिवसेनेचे सर्व सदस्य अनुपस्थित राहिल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आह़े नंदुरबार पालिकेची निवडणूक गेल्या वर्षीच झाली़ आमदार शिरीष चौधरी यांचे बंधु डॉ़ रविंद्र चौधरी यांना भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे करण्याचे चित्र निर्माण केले होत़े त्यामुळे काँग्रेसनेही आपले स्थान मजबूत असताना भाजपाचे आव्हान पेलण्यासाठी स्थानिक स्तरावर भाजपाशी नाराज असलेल्या शिवसेनेला जवळ करुन युती केली होती़ या युतीत कॉँग्रेसने शिवसेनेला पाच जागा दिल्या होत्या़ त्यापैकी निवडणूकीत शिवसेनेने चार जागा जिंकल्या तर काँग्रेसने 26 जागा जिंकून एकतर्फी यश मिळवले होत़े पहिल्या वर्षी उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडताना उपनगराध्यक्षपद शिवसेनेला दिले होत़े याशिवाय एक स्विकृत सदस्याची जागाही दिली होती़ त्यामुळे वर्षभर काँग्रेस-शिवसेना युतीत एकमेकांचा चांगला सूर जुळला होता़ दरम्यान वर्षभराच्या काळानंतर शनिवारी उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडीसाठी बैठक झाली़ त्यात शिवसेनेचे चारही सदस्य अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आह़े या संदर्भात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ़ विक्रांत मोरे यांनी पालिकेत आपले संख्या बळ कमी असल्याने त्याचा निवडणूकीवर काही परिणाम नसल्याने आपले सदस्य अनुपस्थित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आह़े या प्रतिक्रियेत मात्र अप्रत्यक्ष नाराजीचा सूर व्यक्त होत आह़़े सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेने यावेळी देखील उपनगराध्यक्ष पद मिळावे व 1 स्विकृत सदस्य पदाची जागा मिळावी अशी मागणी केली होती़ मात्र त्यांना काँग्रेसकडून ‘तुमचे संख्याबळ कमी’ असल्याचे उत्तर मिळाल्याने शिवसेनेने अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आह़े याबाबत शिवसेनेच्या एका पदाधिका:याने सांगितले की, युती झाली त्यावेळी काँग्रेसने आपल्याला जेवढय़ा जागा दिल्या तेवढय़ावर आपण समाधान मानले, जर त्याचवेळी जास्त जागांची मागणी केली असती तर आपलेही सदस्य जास्त निवडून आले असते व किमान स्विकृत सदस्याला आवश्यक तेवढे सदस्य निवडून आले असत़े पण आपण काँग्रेसवर विश्वास ठेवला़ राज्यातही अनेक छोटय़ा पक्षांसोबत भाजपाने युती केली होती़ निवडणूकीत ते पराभूत झाले तरी भाजपाने त्यांना विधानपरिषद सदस्य करुन मंत्रीपद दिले आह़े त्यामुळे युती झाल्यानंतर काँग्रेसने सहकारी पक्ष मानून शिवसेनेलाही पालिकेत स्थान देणे आवश्यक असल्याचे सांगितल़े एकूणच उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडी संदर्भात शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली असून वर्षभरातच काँग्रेस व शिवसेना युतीत दुराव्याचे चिन्ह निर्माण झाले आह़े