लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अरुणाचल प्रदेशात अपघातग्रस्त लष्कराच्या विमानातील विंग कमांडर जी.एम.चाल्र्स यांना वीर मरण आले असून ते नंदुरबारला काही वर्ष शिकल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. येथे त्यांचे आजोळ होते. नंदुरबारात अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांच्या मामांनी प्रयत्न केले. परंतु प}ी जोहराट येथे असल्याने तेथेच अंत्यसंस्कार झाले.एएन-32 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विमानातील विंग कमांडर जी.एम.चाल्र्स यांना वीर मरण आले. चाल्र्स उर्फ महेंद्र गंता हे नंदुरबारातील त्यांच्या आजोळला इयत्ता सातवीत असतांना आले होते. येथील एस.ए.मिशन विद्यालयात त्यांनी सातवी ते दहावीचे शिक्षण घेतले. 1998 साली ते दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर एसपीआय शिक्षणासाठी ते औरंगाबाद येथे गेले. एनडीएचे शिक्षण खडकवासला येथे पुर्ण केल्यानंतर त्यांची लष्कराच्या हवाई दलात नियुक्ती झाली होती. चंदीगड, आग्रा व आता अरुणाचल प्रदेशातील जोहराट येथे नियुक्ती होती. त्यांच्या पश्चात प}ी सोनल व मुलगी मिहिका असा परिवार आहे. मृतदेह जास्त दिवस ठेवण्याच्या स्थितीत नसल्याने जोहराट येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. प}ी तेथे उपस्थित होती. त्यांच्या मित्र परिवारातील सदस्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
विमान अपघातातील विंग कमांडर नंदुरबारात शिकलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 20:59 IST