शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:32 IST

चहावाल्याने कडक सरकार दिल्याचा दावा

नंदुरबार : मोदी सरकार आदिवासींचे आरक्षण काढून घेणार असल्याची अफवा पसरविली जात आहे. मात्र जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणावर व जमिनीवर कुणीही हात लावू शकणार नाही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी नंदुरबार येथे झालेल्या सभेत दिला.नंदुरबार व धुळ्याचे भाजपचे उमेदवार डॉ.हीना गावीत आणि डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी येथील धुळे रस्त्यावरील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या वेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, नव्या भारताच्या उभारणीसाठी भाजपने गेल्या पाच वर्षात अनेक विकास योजना राबवल्या आणि लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवल्या.काँग्रेस सरकारच्या राजवटीत कर्जमाफी दिली गेली पण ज्यांच्यासाठी ती दिली गेली त्या आदिवासींपर्यंत ती पोहोचली नाही. केवळ धनधांडग्यांसाठीच ती योजना होती. कारण आदिवासींचे बँकेत खातेच नव्हते. त्यामुळे त्यांना कर्ज मिळाले नव्हते. पण भाजप सरकार सत्तेवर येताच आदिवासींचे खाते उघडवले आणि थेट लाभ त्यांच्या खात्यात पोहोचवला.‘आधार’ची योजना काँग्रेसने नंदुरबारपासून सुरू केली आणि ती योजना बंद व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांनीच दावा दाखल केला. लोकांची फसवेगिरी करण्याचे काम काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे नेते करीत होते असा आरोप त्यांनी केला.देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी असलेली पाच एकरची अट काढून ती सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान, नंदुरबारच्या चहाचा संदर्भ देत एक चहावाल्यानेही गेल्या पाच वर्षात कडक सरकार दिल्याचा दावाही त्यांनी केला.आदिवासींच्या वनउपजाला योग्य भाव देऊन आदिवासी शेतकºयांना समृद्ध करण्याचा, कुपोषण, सिकलसेल व आरोग्याबाबत व्यापक योजना राबविण्याचा प्रयत्न आगामी काळात राहणार असल्याचे सांगून भाजपचे सरकार आल्यास यापुढे आदिवासी शेतकºयांना बांबूच्या शेतीसाठी परवानगी देण्याचा निर्णय तसेच या शेतकºयांसाठी पेन्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या वेळी त्यांनी काँग्रेसच्या काळातील धोरणात्मक निर्णयावर आरोप करीत त्यांनी जनतेची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारण