नंदुरबार : एस. टी. बस कुठे आहे, हे कळण्यासाठी प्रत्येक बसला जीपीएस सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १५ ऑगस्टचा मुहूर्त होता; परंतु एकाही बसला हे उपकरण बसविण्यात आलेले नसल्याचे चित्र जिल्ह्यातील चारही आगारांतील आहे. लांब पल्ल्याच्या बसेस नेमक्या कुठे आहेत, स्थानकात किती वेळेत पोहोचतील यांसह इतर माहिती याद्वारे मिळणार आहे.
नंदुरबार आगारात ११५ बसेस आहेत; तर शहादा आगारात ११२, नवापूर आगारात ७६ व अक्कलकुवा आगारात ६७ बसेस आहेत. यांतील अनेक बसेसची अवस्था अतिशय खराब आहे.
जिल्ह्यातील चारही आगारांत मिळून ३७० एस.टी. बसेस आहेत. त्यांतील एकाही बसला संबंधित यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. सहसा लांब पल्ल्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बसेसनाच अशी यंत्रणा बसविण्याचे प्राथमिक नियोजन आहे.
१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला, मुहूर्त हुकला
नंदुरबारसह चारीही आगारांतील काही बसेसना हे उपकरण बसविले जाणार होते. त्यासाठी १५ ऑगस्टचा मुहूर्त होता; परंतु प्रशासकीय व इतर कारणांमुळे सध्या तरी एकाही बसला असे उपकरण बसविण्यात आलेले नसल्याचे जिल्ह्यातील चारीही आगारांतील चित्र आहे.
सर्वांनाच सोयीचे...
n अशा प्रकारची यंत्रणा बसल्यास ती सर्वांनाच सोयीची ठरणार आहे. त्यामुळे त्याची प्रतीक्षा लागून आहे.
n बस ठरावीक वेळेपेक्षा उशिरा आल्यास खराब होणे, रहदारी असणे, गर्दी अशी कारणे दिली जातात; परंतु या उपकरणांमुळे पारदर्शकता राहणार आहे.