कोरोना महामारीत अनेकांचा रोजगार गेल्यामुळे घर चालवणे मुश्कील झाले आहे. रोजगारच्या शोधात अनेकजन दैनंदिन ये- जा करतात. मात्र, कमी पल्ल्याच्या रेल्वेगाड्या अद्याप सुरू झाल्या नसल्याने खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुसऱ्या ॲनलॉकनंतर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांतील जळगावहून नंदुरबार मार्गे बांध्रा, मुंबईपर्यंत जाणारी एकमेव खान्देश एक्स्प्रेस अद्याप सुरू झाली नसल्याने शासकीय, तसेच इतर कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
रिवा राजकोट एक्स्प्रेस
नवजीवन सुपरफास्ट एक्स्प्रेस
हापा बिलासपूर एक्स्प्रेस
अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस
ताप्ती गंगा एक्स्प्रेस
अहमदाबाद पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस
या गाड्या कधी सुरू होणार?
मुंबई बांध्रा खान्देश एक्स्प्रेस
सुरत अमरावती स्पेशल
सुरत भुसावळ पॅसेंजर
महामाना वडोदरा वाराणसी एक्स्प्रेस
पॅसेंजर गाड्यांचे घोडे कुठे अडले?
भुसावळ ते सुरत मार्गावर दिवसातून दोन रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहे. त्यामुळे दिवसभरात इतरवेळी पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडी उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे.
पॅसेंजर सेवेच्या तिकिटाची दरवाढ करण्याचा निर्णय सुरू असल्याने त्यामुळे सुरत भुसावळ रेल्वेफेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.
पॅसेंजर सेवा देणारी सुरत भुसावळ लोकल पॅसेंजर व मेमू उधना नंदुरबार या गाड्या सध्या मुख्य स्टेशनचे थांबे घेत असल्याने प्रवाशांना मधले अंतर खासगी वाहनाने जावे लागत आहे.
गेल्या चार तासांपासून रेल्वेस्थानकावर बसून आहे. मात्र, कोणत्याही रेल्वेगाड्या येत नसल्याने मला ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाने दुसरा ॲनलॉक जाहीर होऊनही सुरत ते भुसावळ या मार्गावर अद्याप वाढीव गाड्या सोडण्यात येत नसल्याने हाल होत आहेत.
-राजेंद्र जगताप, प्रवासी, नंदुरबार
लांब पल्ल्याच्या मोजक्या रेल्वेगाड्या असून, त्यामुळे डब्यात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यामुळे उर्वरित बंद असलेल्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज असून, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजाणी करण्यासाठी शासनाने महत्त्वाच्या रेल्वे प्रवासी गाड्या सुरू कराव्यात.
-भरत पाटील, प्रवासी, नंदुरबार