शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

खबरदारीविनाचा भरला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी बंद ठेवण्यात आलेले आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी बंद ठेवण्यात आलेले आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते. या आदेशानंतर सात महिन्यानंतर नंदुरबार शहरातील आठवडे बाजार सुरू झाला आहे. सात महिन्यानंतर सुरू झालेल्या या बाजाराला माहितीअभावी तुरळक प्रतिसाद मिळाला. शहरातील मंगळबाजार, भोईगल्ली, मढी चाैक यासह घी बाजारपर्यंत आठवडे बाजार भरण्याची शतकाची परंपरा आहे. परंतू गेल्या सात महिन्यापूर्वी लाॅकडाऊन घोषित झाल्यानंतर हा बाजार बंद झाला होता. दर मंगळवारी परीसरातील आदिवासी बांधवांसह जवळपासचे भाजीपाला व इतर चीजवस्तू विक्रेते या बाजारात हजेरी लावत होते. परंतू बाजार बंद असल्याने त्यांचा रोजगार बुडाला होता. मंगळवारी बाजार सुरू होणार अशी माहिती नसल्याने यातील अनेक जण बाजारात येवू शकलेले नाहीत. दरम्यान सात महिन्यानंतर बाजार सुरू झाला असला तरी खबरदारीचे उपाय म्हणून काहीही करण्यात आलेले नसल्याचे दिसून आले. प्रामुख्याने सॅनेटायझर्स, मास्क यांचा वापर करणे गरजेचे असताना व्यावसायिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले. प्रशासनाकडूनही बाजार सुरू झाला असताना नागरीकांना कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नव्हत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करणे गरजेचे असताना शहरातील अरुंद गल्ल्यांमध्ये जागा पटकावून बसलेल्या भाजीपाला विक्रेत्या महिलांमुळे वाहतूकीस अडथळा येत होता. 

शहाद्यातही भरला आठवडे बाजार दरम्यान एकीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले असताना नंदुरबार नगरपालिकेने खाली बसून भाजीपाला विक्री करणारे तसेच दुकानाबाहेर सामान ठेवून अडथळा निर्माण करत सोशल डिस्टन्सिंगचा भंग करणार्या विक्रेत्यांवर कारवाई केली होती. पालिकेने नियुक्त केेलेले वाहन बाजारात दिवसभर सूचना करत फिरत होते. बाजारपेठेत खाद्यपदार्थ विक्रेते तसेच रस्त्यावर कापड विक्री करणार्यांकडे गर्दी होत होती. दरम्यान नंदुरबार सोबतच शहादा येथेही मंगळवारी आठवडे बाजार भरवण्यात आला होता. याठिकाणीही नागरीकांनी गर्दी केल्याची माहिती आहे. दरम्यान तहसील प्रशासन पुढील आठवड्यापासून आठवडे बाजारात पथक नियुक्त करणार असल्याची माहिती दिली गेली आहे.