शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यात तापमान चाळीशी गाठणार

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: March 17, 2019 11:59 IST

‘आयएमडी’चा इशारा : शुष्क व उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढणार, नंदुरबारचा पारा ३७ अंशावर

संतोष सूर्यवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पूर्वेकडून येत असलेल्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात येत्या आठवड्यात तापमान चाळीशीपार जाणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ तसेच ‘स्कायमेट’ या खाजगी हवामान संस्थेकडून वर्तविण्यात आला आहे़पुढील काही दिवसात होणाºया तापमान वाढीची चाहूल नंदुरबारकरांना शनिवारी लागली़ नंदुरबारात तब्बल ३७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली़ तर जळगाव व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान अनुक्रमे ३६.३ व ३७.६ इतके नोंदविण्यात आले़उन्हाळ्याची सुरुवात झाली असल्याने पुर्वेकडून मोठ्या प्रमाणात उष्ण वारे वाहत आहेत़ त्याच प्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये शुष्क वाऱ्यांचा प्रभाव जाणवनार असल्याचे ‘आयएमडी’कडून सांगण्यात आले आहे़ त्यामुळे साहजिकच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़सध्या हिमालयाच्या पायथ्याशी ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ तर मध्य प्रदेशच्या मध्य भागाच्या वर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे़ त्यामुळे पुर्वेकडून उष्ण वाºयांचा प्रभाव राज्यभरात वाढताना दिसून येत आहे़ यामुळे संभाव्य तापमान वाढ होणार आहे़दरम्यान, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झालेली आहे़ तर काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झालेली बघायला मिळाली़ विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचीत वाढ झालेली आहे़ राज्यात उर्वरीत भागात कमाल व किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे़दरम्यान, १७ मार्च रोजी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे़ तर खान्देशसह उत्तर महाराष्ट्र तापमान कोरडे व उष्ण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ दरम्यान, १७ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा इशारा ‘आयएमडी’ पुणेतर्फे देण्यात आला आहे़दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळापुर्वीची स्थिती निर्माण झालेली आहे़ तसेच बाष्पीभवन होऊन पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, हा कमी दाबाचा पट्टा विदर्भाच्या उत्तरेकडे निर्माण झाला आहे़ त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे़तापमानात वाढ होणार असल्याचे याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसून येत आहे़ नंदुरबारात दुपारच्या वेळी मुख्य वर्दळीच्या ठिकाणी बºयापैकी शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे़नंदुरबारात सध्या ताशी १२ किमी वेगाने वारे वाहत आहेत़ वाºयाचा बºयापैकी प्रभाव जाणवत असल्याने साहजिकच धुळीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे़ नंदुरबारात शनिवारी कमाल ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे़ तर १ हजार ५ हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण झालेला होता़ आद्रता साधारणत २९ टक्के इतकी होती़ आद्रतेत हळुहळु वाढ होणार असल्याने साहजिकच उकाड्यातही वाढ होणार असल्याची शक्यत व्यक्त करण्यात येत आहे़दरम्यान, पंजाब, हरियाना, छत्तीसगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमधून कमी दाबाचा पट्टा जात असल्याने या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत तापमानात किंचित वाढ जाणवणार आहे़ त्यामुळे येथील उष्ण लहरींमुळे महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे़ पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहणार आहे़