शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

हमसे का भूल हूई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:32 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विषय समिती बदलाचा निर्णय एकतर्फी घेता, किमान मला विश्वासात तर घेतले ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विषय समिती बदलाचा निर्णय एकतर्फी घेता, किमान मला विश्वासात तर घेतले असते, सदस्यांची बैठक कधी झाली, एकमताने कधी ठरविले गेले याबाबतचा खुलासा करावा अशी अपेक्षा व्यक्त करीत सभापती अभिजीत पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना लेखी पत्र दिले. त्यामुळे विषय समिती बदलाबाबतची चर्चा रंगली आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेतील विषय समितींच्या बदलाचा निर्णय शुक्रवारच्या सर्वसाधारणत बैठकीत घेण्यात आला. शिवसेनेची सुरुवातीपासूनच अर्थ व बांधकाम समिती मिळावी यासाठीची मागणी होती. परंतु सत्ता स्थापनेच्या वेळी ऐनवेळी घडामोडी होऊन काँग्रेस-सेनेची युती झालेली असतांना त्यात भाजपचे नेते दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री दिपक पाटील यांनी एण्ट्री करीत सभापतीपद मिळविले. शिवाय शिवसेनेला दुय्यम दर्जाचे कृषी व पशुसंवर्धन या समित्या देण्यात आल्या. आणखी एक सभापतीपद किंवा बांधकाम व अर्थ समिती या दोन्हीपैकी काहीही न मिळाल्याने शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नाराज होते. गेल्या पाच महिन्यात ही नाराजी लपून राहिली नाही.गेल्या वेळच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे काही सदस्य व शिवसेनेचे सदस्य अनुपस्थित राहून तांत्रिकदृष्टया अध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अध्यक्षांना अर्ध्यातून सभा सोडावी लागून ती स्थगित करण्यात आली होती. त्याचवेळी यापुढे आणखी घडामोडी घडतील हे स्पष्ट झाले होते. अखेर राजकीय घडामोडी घडून शिवसेनेकडे बांधकाम समिती देण्याचा निर्णय झाला. घडामोडी होतांना काँग्रेस, शिवसेना यांनी भाजपलाही विश्वासात घेतल्याचे आजच्या चित्रावरून स्पष्ट होते. उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी सभेपूर्वी दुपारी दिलेल्या स्रेहभोजनाला भाजपचेही सदस्य उपस्थित राहिले. शिवाय विषय समिती बदलाचा विषय निघाला त्यावेळी देखील काँग्रेस, शिवसेना, भाजप व राष्टÑवादीचे सदस्य देखील शांत होते. त्यामुळे हा विषय एकमताने मंजुर झाल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे याचवेळी सभापती पाटील यांनी आपले म्हणने रेकॉर्डवर घेण्याची सुचना केली. शिवाय अध्यक्षांना लेखी पत्रही दिले. त्याची उत्तरे मिळावी अशी मागणी केली.अभिजीत पाटील यांची राजकीय पार्श्वभुमी वडिल शहाद्यात भाजपचे नगराध्यक्ष आहेत. तर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली होती. त्याचे वलय पहाता त्यांना सभापतीपदही मिळाले आहे. परंतु विषय समिती बदलाच्या वेळी त्यांना विश्वासात न घेतले गेल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे आजचा निर्णय एकमताने झाला असल्याचे बोलले जात असले तरी अभिजीत पाटील यांची खदखद कायम आहे. जिल्हा परिषदेत सर्वच पक्ष सत्ताधारी आहेत. काँग्रेसला अध्यक्ष व दोन सभापती, शिवसेनेला उपाध्यक्षपद तर भाजपला एक सभापतीपद दिले गेले आहे. राष्टÑवादीचे तीन सदस्य भाजपाच्या गटात आहेत. त्यामुळे येथे विरोधीपक्षच कुणी नसल्याची स्थिती आहे.