शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील अतिक्रमणधारक आमरण उपोषणाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरात बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत त्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आह़े यावेळी व्यथा मांडून तोडगा काढण्याची मागणी केली़ शहादा शहरातील बसस्थानक ते स्टेट बँक आणि डोंगरगाव रोड भागात असलेले 100 पेक्षा अधिक अतिक्रमण पालिकेने काढले होत़े यातील बहुतांश अतिक्रमण हे 1995 पूर्वीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरात बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत त्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आह़े यावेळी व्यथा मांडून तोडगा काढण्याची मागणी केली़ शहादा शहरातील बसस्थानक ते स्टेट बँक आणि डोंगरगाव रोड भागात असलेले 100 पेक्षा अधिक अतिक्रमण पालिकेने काढले होत़े यातील बहुतांश अतिक्रमण हे 1995 पूर्वीचे आहेत़ अतिक्रमणधारकांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका, पालिकेचे ठराव यांची माहिती जिल्हाधिकारी यांना देत, पालिकेने पर्यायी जागा किंवा इतर कोणत्या बाबीत सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली़ ऐन दिवाळीत झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली होती़  निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या कारवाईला अनुकूल प्रतिसाद देऊन स्वखर्चाने साहित्य काढून घेत शासकीय नियमांचे पालन केल़े पालिकेने केवळ ठराव केला आह़े याबाबत पालिका सभागृहात चर्चा झाली नाही़ 1995 पूर्वीपासून या जागांना मुंबई हायकोर्टाने स्थगिती आदेश देऊन पर्यायी जागा दिल्याशिवाय दुकाने हटवू नयेत असे म्हटले होत़े विद्यमान जागेवर दुकाने होत्या, त्या दृष्टीने केव्हाही कोणत्याही त:हेने अडथळा ठरत नाहीत़ शहादा शहरातील एस़टी़स्टँण्डच्या भिंतीला लागून आत जाण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या मधल्या भिंतीला लागून असलेल्या जुन्या गटारीच्या पलीकडे ही दुकाने सुरू होती़ पालिकेकडून येथील अतिक्रमण काढूनही ही जागा वापरात येणे शक्य नाही़ येथून वाहतूक करणे शक्य नाही़ या दुकानांच्या माध्यमातून सर्वाचा उदरनिर्वाह सुरू होता़ यामुळे या जागेची पाहणी करून पुढील कारवाई करण्याचे म्हटले आह़ेप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार शिराळकर, नथ्थू साळवे, सुनिल गायकवाड, रवि मोरे, रमाकांत बच्छाव, गोविंद मराठे, गिरीष शर्मा, विठ्ठल सोनार, फरीद खान पठाण, संदीप पानपाटील, ताराबाई धोबी यांच्यासह अतिक्रमणधरक उपस्थित होत़े