शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

तरंगत्या अॅम्ब्युलन्सने वेधले ब्रिटनच्या ‘ग्रॅँट’ यांचे लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:02 IST

आंतराष्ट्रीय परिसंवाद : आरोग्यमंत्र्यांनी दिली ब्रिटनच्या पथकाला माहिती

ठळक मुद्देबोट अॅम्ब्युलन्सचे कौतुक झाले, मात्र ही सेवा नर्मदा काठावरील गावांना नियमित मिळावी, यासाठी सुधारणा होणे आवश्यक आह़े त्यासाठी प्रत्येक गावात ही अॅम्ब्युलन्स कधी येणार त्याचे शेडय़ुल लावले पाहिजे, त्यावर भोंगा बसवला पाहिजे, आणि नियमित डॉक्टर दिले पाहिजेत़ -

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदा काठावर सुरू असलेल्या तरंगत्या अॅम्ब्युलन्सची चर्चा थेट आंतरराष्ट्रीय परिसंवादात रंगली असून या दवाखान्यांची माहिती जाणून ब्रिटनचे राष्ट्रीय आरोग्य सेवेचे अध्यक्ष माल्कम ग्रँट यांनीही कौतूक केल़े इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सव्र्हिसेसतर्फे मंगळवारी मुंबई येथील हॉटेल ताज लॅन्डसमध्ये आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्यात आला़ या परिसंवादात आरोग्यमंत्री डॉ़ दिपक सावंत यांनी राज्यातील आरोग्यसेवेची माहिती दिली़ त्यात विशेषत: नर्मदा काठावर सुरू असलेल्या बोट अॅम्ब्युलन्सची विशेष माहिती दिली़जिल्ह्यातील 33 गावांचे सरदार सरोवर प्रकल्पामुळे पुनर्वसन करण्यात आले आह़े ही गावे सध्या नर्मदेच्या पाणलोट क्षेत्रात आल्याने त्याठिकाणी बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आह़े त्यामुळे या गावांना जाण्यासाठी पाण्यातूनच बोटीने जावे लागत़े परिणामी या भागात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी देखील प्रशासनाने बोटीचाच आधार घेतला असून गेल्या 15 वर्षापासून या परिसरात तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून सेवा दिली जात आह़े त्यात सुधारणा करून गेल्या दोन वर्षापूर्वी या परिसरात खास तरंगती रूग्णवाहिका अर्थातच बोट अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली़ 16 जानेवारी 2016 ला युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ करण्यात आला होता़ राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत ही अॅम्ब्युलन्स बनवण्यात आली असून त्यासाठी एक कोटी 37 लाख रूपये खर्च झाला आह़े त्यानंतर पुन्हा दोन अॅम्ब्युलन्स या भागात सेवेसाठी दाखल झाल्या आहेत़ ब्रिटनमधील बाईक अॅम्ब्युलन्सची दखल भारताने घेऊन महाराष्ट्रातही तशाप्रकारची  सेवा सुरू केली आह़़े या पाश्र्वभूमीवर सातपुडय़ातील बोट अॅम्ब्युलन्स सेवेने ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे अध्यक्ष माल्कम ग्रँट हे प्रभावित झाल़े त्यांनी या सेवेचे कौतूक करीत आधुनिक तंत्रज्ञाच्या आदान-प्रदानाबाबत चर्चाही केली़