शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारला आंबेबारा मधून पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी आष्टे पंपीग स्टेशनची विहिर आटल्याने आता आंबेबारा धरणातून चारीद्वारे पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी आष्टे पंपीग स्टेशनची विहिर आटल्याने आता आंबेबारा धरणातून चारीद्वारे पाणी आणून ते शहराला पुरविले जाणार आहे. धरणातील ५० टक्के पाणीसाठा आधीच आरक्षीत करण्यात आला आहे.नंदुरबार शहराला झराळी व आष्टे पंपींग स्टेशनमधून पाणी पुरवठा केला जातो. झराळी येथील विरचक धरणात यंदा मुबकल पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा यंदा सामना करावा लागणार नाही हे स्पष्ट आहे. आंबेबारा धरणातील ५० टक्के पाणीसाठा देखील आरक्षीत केला जातो. यंदा आंबेबारा धरण देखील ओव्हरल्फो झाले होते. त्यामुळे पाणी पुरवठ्याची फारशी अडचण यंदा येणार नाही हे स्पष्टच आहे.आष्टे येथे शिवण नदीत नंदुरबार पालिकेने पाणी पुरवठ्यासाठी विहिर खोदली आहे. या विहिरीवरच पंपींग स्टेशन देखील आहे. जोपर्यंत या विहिरीला पाणी असते तोपर्यंत तेथून ३० टक्के भागात पाणी पुरवठा केला जातो. परंतु ही विहीर साधारणत: मार्च महिन्यात आटून जाते. यंदा देखील ही विहिर आटली आहे. त्यामुळे आता आंबेबारा धरणातील पाणी या विहिरीत टाकले जाणार आहे. धरणातील पाणी सोडण्याचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. पालिकेचे पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले.नदीत चारी खोदून हे पाणी आष्टे विहिरीत येणार आहे. साधारणत: दोन महिने हे पाणी चालू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या विहिर अटल्याने झराळी पाणी पुरवठा योजनेवर लोड येत होता. त्यामुळे शहरातील जलकुंभ पुर्ण क्षमतेने भरले जात नव्हते. परिणामी अनेक वसाहतींमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता. आता आंबेबाराचे पाणी आल्याने पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.नंदुरबार शहराला विरचक धरणातून ७० ते ७५ टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित भागातील पाणी पुरवठा हा आष्टे पंपींग स्टेशनमधून केला जातो. त्यासाठी आंबेबारा धरणाचा आधार घेतला जातो. साधारणत: तीन महिने येथून पाणी पुरवठा केला जात असतो.