शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भवर येथील ग्रामस्थ सोसताहेत पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:31 IST

जलकुंभातही ठणठणाट, महिलांची पाण्यासाठी पायपीट

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : तळोदा तालुक्यातील भवर येथे गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आह़े  त्यामुळे येथील ग्रामस्थांवर डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आह़े याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याची समस्या दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़ेगेल्या काही दिवसांपासून येथे पाणीपुरवठय़ात बिघाड झाल्याने पाण्याची समस्या भेडसावत आह़े त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी लगतच्या गावात 10 किमीर्पयत पायपीट करावी लागत आह़े सध्या उन्हाळा सुरु झाला असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर टंचाई जाणवू लागली आह़े मजुरांना आपला रोजगार बुडवून पाण्याचा शोध घ्यावा लागत आह़े पाणीटंचाईमुळे त्यांना आर्थिक फटकादेखील सहन करावा लागत आह़े पाण्याची कमतरता असल्याने त्यांना पिक जगविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत असल्याची स्थिती आह़े अनेक ठिकाणी कुपनलिका बंद पडल्या आहेत़ अजून उन्हाळ्याची तीन महिने शिल्लक असताना मार्च महिन्यातच जलस्त्रोत आटत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े यंदा मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसर्पयत गेला आह़े त्यामुळे येत्या काळात उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने सोसाव्या लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े भवर येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत संपूर्ण गावासाठी पाण्याची सोय व्हावी या करीता जलकुंभ बांधण्यात आले होत़े मात्र या जलकुंभात पाणी चढविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने यातही ठणठणाट असल्याची स्थिती आह़े अनेक वेळा जनावरांनादेखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसत़े त्यामुळे पशुपालकांसमोर समस्या निर्माण होत असत़े दरम्यान, या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून पर्यायी व्यवस्था म्हणून हातपंपावर सौर उज्रेव्दारे  चालणारे मोटरपंप बसविण्यात आले आह़े परंतु तेही गेल्या काही दिवसांपासून बंद पडले असल्याचे दिसून येत आह़े गावातील महिलांना घरची तसेच शेतीची कामे सोडून पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागत आह़े त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आह़े