शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खरवड येथे 500 फुटांर्पयत पाणी पातळी खोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:40 IST

अनेक ठिकाणी कुपनलिकाही आटल्या

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : तळोदा तालुक्यातील बोरद व मोड परिसरातील पाणी पातळी खालावली आह़े खरवड, खेडले, त:हावद आदी गावांमध्ये पाणीपातळी 500 फुटांर्पयत खोल गेल्याने ग्रामस्थांकडून पाण्यासाठी वणवण करण्यात येत आह़े परिसरात ऊस, केळी आदी पिके घेण्यात आली आहेत़ परंतु पाण्याअभावी पिक करपत असल्याची व्यथा शेतक:यांकडून मांडण्यात येत आह़े ऐन दुपारच्या रणरणत्या उन्हात परिसरातील महिला तसेच लहान मुल पाण्याच्या कळशा, भांडी घेऊन जाताना दिसून येत असतात़ सुरुवातीलाल 100 फुटांर्पयत खोल गेलेली पाण्याची पातळी आता पाचशे फुटांर्पयत खोल गेल्याने ग्रामस्थ पाण्याअभावी बेजार झाले आहेत़ खरवड, खेडले व त:हावद या गावांची परिस्थिती अत्यंत वाईट आह़े या परिसरात विहिरीदेखील नाहीत़ परिणामी जलस्त्रोत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आह़ेपरिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी हातपंपावर दिवसभर रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत  आहेत. परिसरात विहिरी नसल्याने ग्रामस्थ तसेच शेतक:यांकडून ठिकठिकाणी कुपनलिका करण्यात आल्या आहेत़ परंतु त्यांचीसुध्दा पाणीपातळी खोल गेल्याने त्या आटल्या आहेत़ कृषिपंपातून पाणी पूर्ण क्षमतेने येत नसल्याने येथील पिक धोक्यात आली आहेत़ त्यामुळे साहजिकच पाण्यासाठी शेतक:यांकडून जुळवाजुळव करण्यात येत आह़े यंदा या ठिकाणी जलयुक्त शिवारची मोठी कामे झालेली आहेत़ त्यामुळे भविष्यात याचा फायदा होणार असल्याची आशा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आह़े हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा वेळेत मान्सून दाखल होणार आह़े परंतु तरीसुध्दा अजून उन्हाळ्याचा साधारणत दीड महिना काढायचा असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े या ठिकाणी बराचसा परिसर हा सपाटीवर आह़े त्यामुळे साहजिकच येथे पाण्याची पातळी खालावत असत़े कृषिपंपातून अत्यंत कमी दाबाचे पाणी येत आह़े त्यातच अनेक वेळा महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत असतो़ त्यामुळे शेतक:यांना अजूनच समस्यांचा सामना करावा लागत असतो़ अनेकवेळा जनावरांनादेखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे ग्रामस्थ, अबालवृद्धांना पाण्यासाठी हातपंपावर दिवसभर रांगा लावाव्या लागत आहे. ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे पाण्यासाठी फिरफिर होत असल्याने साहजिकच ग्रामस्थांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील अनेक पशुपालकांचे पाण्यासाठी स्थलांतर झाले आहेत़ ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी जाण्यास पशुपालक पसंती देत असतात़ अनेक पशुपालकांना आपली जनावरे विकण्याचीदेखील वेळ आली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े