शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

हे पहा व्हिडीओ फुटेज, सांगा कुठे केला ठराव... घरपट्टीचा वाद: दूध का दूध-पाणी का पाणी, चंद्रकांत रघुवंशी यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 12:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णयच झाला नाही हे मिटींगचे संपुर्ण १८ मिनीटांचे व्हिडीओ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णयच झाला नाही हे मिटींगचे संपुर्ण १८ मिनीटांचे व्हिडीओ फुटेज दाखवून ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ची विरोधकांची मागणी पुर्ण करीत असल्याचे सांगून नगरपालिकेच्या हिताच्या आड येणाऱ्या नगरसेवकांवर बडतर्फीची कारवाई का करण्यात येऊ नये? यासाठी वकिलांचा सल्ला घेणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.नंदुरबार पालिकेच्या १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी सहा महिन्याची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय झाला असल्याचे डिजीटल बॅनर शहरात लावले होते. भाजपने मागणी केल्यामुळेच हा निर्णय झाल्याचा त्यांचा दावा होता. परंतु बैठकीत असा निर्णयच झाला नाही असे सत्ताधारी गटाचे म्हणने होते. त्यामुळे दिशाभूल करणारे डिजीटल बॅनर लावणाऱ्यांवर कारवाईचा इशारा नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिला होता. त्यावरून राजकारण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याच अनुषंगाने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ज्या सर्वसाधारण सभेतील हा विषय झाला त्या सभेचे संपुर्ण मिटींगचे १८ मिनीटांचे व्हिडीओ फुटेज दाखवून असा निर्णय कधी झाला, चर्चा कधी व काय झाली त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. पालिकलेचे अजेंडे ८ तारखेला वाटप झाले. विरोधी गटनेता चारूदत्त कळवणकर यांनी १२ तारखेला पत्र देऊन मागणी केली. अर्थात बैठकीत नागरिकांच्या हिताचे निर्णय होत असून त्याचे श्रेय सत्ताधारी गटाला जाणार याची भिती वाटल्यने घाईघाईने ते पत्र दिले गेले. परंतु सभेत विषय क्रमांक आठ घरपट्टी जनरल रिव्हीजन न करणे आणि विषय क्रमांक १६ महिनाभराच्या आत मालमत्ताकर भरल्यास १० टक्के सुटचा निर्णयाचा विषय होता. त्यावेळी हे दोन्ही विषय बहुमताने मंजुर झाले. त्यावेळी सहा महिन्याची घरपट्टी माफचा विषय विरोधकांनी काढला नाही. आयत्या वेळच्या विषयातही तो नव्हता असा दावा व्हिडीओ फुटेज दाखवून त्यांनी केला. महिला नगराध्यक्षांना धमकवणेअसे असतांना मग डिजीटल बॅनर लावून लोकांची दिशाभूल भाजपने का केली? बॅनर काढण्याचे आवाहन केले तर महिला नगराध्यक्षाला ‘हिंमत असेल तर बॅनर काढून दाखवा’ असे आव्हान दिले गेेले. महिला नगराध्यक्षांना असे आवाहन देणे ही कुठली सुसंस्कृत पद्धत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. घरपट्टी : अधिकार नाहीपालिकेला घरपट्टी माफ करण्याचा मुळात अधिकारच नाही. सूट देणे आणि माफ करणे यात      मोठा फरक आहे. त्यामुळे असा   निर्णय कुठलीची पालिका घेऊ शकत नाही हे साधे लॅाजीक असतांना जनतेची दिशाभूृल करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला असल्याचेही चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, सभापती कैलास पाटील, दीपक दिघे, कुणाल वसावे, परवेजखान आदी उपस्थित होते.