लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांसह प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा आॅनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. यातील आॅनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना देता येईल का? यासाठी पर्याय अर्ज आॅनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. परंतु सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील मोलगी, दहेल आदी भागातील विद्यार्थ्यांना हा अर्ज करताना नेटवर्कअभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच लॉकडाउनमुळे प्रवाशी वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयातही येण्यासाठी कसरत करून यावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.पावसापासून बचावासाठीसागच्या पानांचा आधारआॅनलाईन अर्ज करण्यासाठी अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पहाडी भागात टेकड्या चढून नेटवर्कच्या शोधासाठी जावे लागत आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस असून सातपुड्याच्या दुर्गम व पहाडी भागात पावसाची नेहमी संततधार सुरू असते. पावसापासून बचावासाठी या विद्यार्थ्यांकडे छत्रीचीदेखील सोय नसल्याने चक्क सागच्या पानापासून बनवलेल्या देशी छत्रीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नेटवर्कसाठी टेकड्यांवर भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:46 IST