शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी रखडल्या अंगणवाडी इमारती

By admin | Updated: January 22, 2017 00:11 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील 400 अंगणवाडी इमारतीविना आहेत. त्यापैकी 140 अंगणवाडी केंद्रांसाठी निधीची मागणी करण्यात आलेली आली

नंदुरबार : जिल्ह्यातील 400 अंगणवाडी इमारतीविना आहेत. त्यापैकी 140 अंगणवाडी केंद्रांसाठी निधीची मागणी करण्यात आलेली आली असून 150 अंगणवाडींचे काम  जागा किंवा इतर भौगोलिक परिस्थितीमुळे होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अजूनही अनेक अंगणवाडी या झोपडीत किंवा कुडाच्या घरात भरत आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अनेक गावांमध्ये अद्यापही अंगणवाडींच्या इमारत नाहीत. अंगणवाडी ही गावाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र मानले जाते. जिल्ह्यात 12 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 2364 नियमित व 70 मिनी असे एकूण 2434 अंगणवाडी मंजूर आहेत. त्यापैकी 1571 अंगणवाडय़ांना स्वत:च्या इमारती आहेत. उर्वरित 863 अंगणवाडींपैकी 370 अंगणवाडी केंद्राची कामे विविध योजनेत प्रस्तावीत आहेत. जवळपास 400 अंगणवाडींना स्वत:ची इमारत नाही.इमारत नसल्याने झोपडीतदुर्गम भागातील अनेक  अंगणवाडींना इमारत नसल्याने त्या झोपडीत सुरू आहेत. काही तर उघडय़ावर भरवल्या जातात. त्यामुळे पोषण आहार देणे, शिजवणे, बालकांचे वजन घेणे यासह इतर   कामे उघडय़ावरच करावी लागतात. त्यामुळे अशा अंगणवाडींना तातडीने इमारती उभ्या कराव्या अशी मागणी आहे. परंतु भौगोलिक परिस्थिती  आणि जागेची अडचण यामुळे ब:याच भागात इमारती उभ्या राहू शकत नाहीत.115 ठिकाणी मिळणार इमारत2014-15 मध्ये आदिवासी उपयोजनेंतर्गत 115 अंगणवाडी केंद्राचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून गट विकास अधिकारी अक्कलकुवा, नवापूर, धडगाव यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. ती कामे जवळपास पूर्ण करण्यात आली  आहेत. 186 अंगणवाडी केंद्राचे बांधकाम करण्यासाठी 2012-13 मध्ये फायबरशिटपासून अंगणवाडी बांधकाम योजना प्रस्तावित करण्यात आली होती. त्याअंतर्गत धडगाव, नवापूर, शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा येथे अंगणवाडी बांधकाम योजना प्रस्तावीत करण्यात आलेली होती. परंतु बांधकाम विभागाने काढलेल्या ई-निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे  186 अंगणवाडी केंद्राच्या कामाची प्रशासकीय मान्यता आदेश रद्द करण्यात येऊन त्या योजनेंतर्गत  निधी परत पाठविण्यात आला होता.भौगोलिक परिस्थितीचा अडसरअनेक भागात भौगोलिक परिस्थितीचा अडसर येत आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत यापूर्वी 192 अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा कार्यालयाकडून गटस्तरावर निधी वितरीत करण्यात आलेला होता. जागेअभावी व भौगोलिक परिस्थितीमुळे तोरणमाळचा खालील भाग, नर्मदा काठावरील गावांचा भागात खर्च वाढल्यामुळे ती कामे त्या त्या वर्षात सुरू झालेली नव्हती. व्याप वाढला, परंतु इमारतींचा अभावअंगणवाडींचा व्याप सध्या मोठय़ा प्रमाणावर वाढविण्यात आला आहे. पोषण आहार देणे, आरोग्यदृष्टय़ा मुलांची, गरोदर मातांची काळजी घेणे, अमृत आहार योजना राबविणे यासह इतर विविध उपक्रमांमध्ये देखील अंगणवाडी सेविकांना काम करावे लागते. त्यात अनेक ठिकाणी इमारती नसल्यामुळे असे दप्तर व कागदपत्रे नाईलाजाने सेविकांच्या घरी ठेवावे लागते. जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्र ही समाजमंदिर, जिल्हा परिषद शाळेची खोली, ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी सेविकेच्या घरी भरवली किंवा चालविली जातात. असे असतांनाही स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा संबंधित आपल्या गावाला अंगणवाडी इमारत उभी राहावी यासाठी प्रय} करतांना दिसत नसल्याचेही चित्र आहे.