शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार्थीना बक्षिसाच्या रकमेची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:03 IST

ग्रामविकास अडखळला : सहा गावे 10 लाखापासून वंचित

नंदुरबार : ग्रामविकास विभागाकडून स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत तालुका आणि जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना सहा महिने उलटूनही बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही़ तालुकास्तरावर प्रथम ग्रामपंचायतीला 10 तर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावणा:या ग्रामपंचायतीला 40 लाख रुपये देण्याची तरतूद आह़े ग्रामविकास विभागाकडून राज्यस्तरावरुन स्मार्ट ग्राम योजना सुरु करण्यात आली आह़े यांतर्गत 5 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या, शहरालगत, पुरस्कारप्राप्त आणि पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे गुणांकन करुन पुरस्कार देण्याची पद्धत अंगीकारण्यात आली आह़े यासाठी स्थानिक स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व कृषी विभागाचे विस्तार अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता, सहायक लेखाधिकारी आणि पंचायत समिती तालुकाविस्तार अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आह़े या समितीकडू दरवर्षी त्या-त्या गावांचे मूल्यांकन करुन गावांची निवड करण्यात येत आह़े यानुसार नंदुरबार जिल्ह्यात 15 ऑगस्टपूर्वी तालुकानिहाय सहा गावे आणि जिल्हास्तरावर एका गावाची निवड करण्यात आली होती़ या गावांना 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आल़े यावेळी या ग्रामपंचायतींना रक्कम देण्याचे सांगण्यात आले होत़े परंतू सहा महिने उलटूनही या ग्रामपंचायतींच्या खाती पुरस्काराची रक्कम जमा करण्यात आलेली नाही़ पुरस्काराची रक्कम रक्कम मिळेल यासाठी पदाधिकारी जिल्हा परिषदेत चकरा मारत आहेत़ यात त्यांना सव्वा लाख रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात येत़े परंतू खात्यावर ‘सव्वा रुपया’ही  आलेला नसल्याचे संबधित पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडून सांगण्यात येत आह़े ही रक्कम देण्याची कारवाई ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ स्तरावरुन होत असल्याचे सांगून जिल्हा परिषद अंग काढून घेत आह़े परंतू शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार पुरस्कार घोषित झाल्यानंतर पुरस्कार वितरणाच्या दिवशीच ‘रोख’ स्वरुपात ही रक्कम संबधितांना देण्याचे म्हटले आह़े यातही सहा महिन्यांचा कालावधी जाऊनही ग्रामपंचायती या रकमेपासून वंचित आहेत़ विशेष म्हणजे या रकमांमधून ग्रामपंचायतींना शुद्ध पेयजल प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन आणि खत निर्मिती, सौर पथदिवे, बायोमास आदी कामे करायची होती़ परंतू निधीच नसल्याने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची निर्मिती संबधित ग्रामपंचायतींसाठी ‘स्वपA’च ठरत असल्याचे बोलले जात आह़े 2017-18 या वर्षात गुणांकनाच्या आधारावर नंदुरबार तालुक्यातील शिरवाडे, नवापूर तालुक्यात बोकळझर, मोहिदा ता़ तळोदा, पुरुषोत्तमनगर ता़ शहाद, खापर ता़ अक्कलकुवा आणि राजबर्डी ता़ धडगाव या गावांना स्मार्ट ग्राम पुरस्कार तालुकास्तरावर घोषित करण्यात आले होत़े या गावांना पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले होत़े ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 लाख रुपये ‘रोख’ देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होत़े परंतू अद्याप त्यांना रक्कम मिळालेली नाही़ पहिल्या टप्प्यात 1 लाख 24 हजार रुपये देण्याचे ग्रामविकास विभागाने सूचित केले होत़े परंतू ही रक्कमही त्यांच्या खात्यांवर आलेली नाही़ या सहा गावांमधून बोकळझर ता़ नवापूर या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर प्रथम म्हणून निवड झाली होती़ पर्यायाने त्यांना तालुक्याचे 10 आणि जिल्हास्तरावरुन 40 असे 50 लाख मिळणे अपेक्षित होत़े परंतू संबधित ग्रामपंचायतीलाही अद्याप रक्कम मिळालेली नाही़ विशेष म्हणजे त्यांना जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्काराचे प्रमाणपत्र येत्या 26 जानेवारी रोजी देण्यात येणार आह़े