शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

तळोद्यात आहार शिजविण्यासाठी सिलिंडरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 13:23 IST

तळोदा तालुका : अंगणवाडींमधील स्थिती, बचत गटाच्या महिला त्रस्त

लोकमत ऑनलाईनतळोदा, दि़ 21 : गरोदर मातांना अंगणवाडय़ांमध्ये देण्यात येणा:या अमृत आहार शिजविण्यासाठी तत्काळ गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने महिला बचत गटांना इंधन म्हणून जळाऊ लाकडांचा वापर करावा लागत असल्याचे चित्र असून, आहार शिजविण्यावरदेखील परिणाम होत आहे. अंगणवाडय़ांनी पुरविण्यात येणारी गॅस सिलिंडर स्थानिक एजन्सीकडूनच उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा बचत गटांनी केली आहे.गरोदर मातांचे सुदृढ आरोग्यासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षापासून डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे.  तळोदा तालुक्यातही 242  ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांमार्फत अशा गरोदर मातांना आहाराचा रोज लाभ दिला जातो. अंगणवाडय़ांमधील आहार शिजविण्याचे काम ग्रामसभेच्या ठरावानुसार त्या-त्या गावातील महिला बचत गटांना देण्यात आला आहे. शिवाय आहार शिजविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अंगणवाडय़ां   ना गॅस सिलिंडरदेखील पुरविण्यात आले आहेत. सिलिंडरचे डबल कलेक्शन देण्यात आले आहे, असे असले तरी हे सिलिंडर तत्काळ मिळत  नसल्याने महिला बचत गटांना इंधन म्हणून लाकडाचा वापर करावा          लागत असल्याची व्यथा आहे.  कारण सिलिंडर संपल्यांनतर लगेच सिलिंडर उपलब्ध होत नाही. आहारावरही त्याचा परिणाम होतअसल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेने नंदुरबार येथील गॅस वितरकांना ठेका दिला आहे. त्यामुळे मागणी करूनही वेळेवर सिलिंडर उपलब्ध होत नसल्याचा आरोप आहे. तातडीने सिलिंडर देण्याची जबाबदारी संबंधित वितकांची असतांना उलट कनेक्शन स्थानिक वितरकाकडे ट्रान्सफर करून द्या असे बेजबाबदार उत्तर हे वितरक देत असल्याचेही बचत गटातील महिला सांगतात. वास्तविक सिलिंडरचा पुरवठा अंगणवाडय़ांना सुरळीत होत नसल्याची तक्रार महिला बचत गटांच्या महिलांनी अंगणवाडय़ा सेविकांमार्फत तळोदा एकात्मिक बालविकास अधिका:यांच्या मिटिंगमध्ये केली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांना सांगितले जात असते. अर्थात           प्रकल्प प्रशासनाकडूनदेखील पाठपुरावा केला जात असला तरी त्यांच्याही पत्रास केराची टोपली दाखविली जात आहे. गॅस कनेक्शन दुस:या एजन्सीकडे असल्यामुळे स्थानिक वितरण बचत गटांना सिलिंडर भरून देत नसल्याची व्यथाही महिलांनी व्यक्त केली आहे. अशा वेळी जळाऊ लाकडाचे सरपन गोळा करावे लागत असते. हे सरपन गोळा करतांनादेखील अतिशय कसरत करावी लागते. त्यामुळे या महिलाही अत्यंत वैतागल्या आहेत. एकीकडे शासन या गरोदर महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस, पुरक आहार देण्याचा प्रय} करीत असतांना दुसरीकडे प्रशासन कोणत्या ना कोणत्या प्रकारे यात खोडा घालून एक प्रकारे योजनेलाच हरताळ फासत असल्याचा आरोपही केला जात आहे. शिजवलेला आहार या गरोदर मातांना वेळेवर मिळाला तर सुदृढ राहील. सिलिंडरच्या पुरवठय़ाची अशी स्थिती राहिली तर अंगणवाडय़ा कोणत्या परिस्थितीत वेळेवर आहार देईल असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंगणवाडय़ांना आहार शिजविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सिलिंडरचा पुरवठा केला जात नसला तरी स्थानिक वितरकांकडून पुरवठा होणे अपेक्षित होते. कारण अंगणवाडय़ांकडून मागणी केल्याबरोबर तत्काळ सिलिंडरचा पुरवठा करता येवू शकतो. मात्र पुरवठा नंदुरबार येथील वितरकांना देण्यात आला आहे. सिलिंडर संपल्यानंतर अंगणवाडी सेविका प्रकल्प प्रशासनाकडे मागणी करतात. त्यानंतर पन्रशासन संबंधित वितरकाकडे मागणी करतात. एवढय़ा क्लिस्ट प्रक्रियेमुळे सिलिंडर ताबडतोब मिळणे अशक्य असल्याचे म्हटले जाते, अशी वस्तुस्थिती लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सिलिंडर अभावी आहारावर होणारा दुष्परिणामाची दखल घेवून निदान स्थानिक वितरकांमार्फत अंगणवाडय़ांना सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी बचत गटांची मागणी आहे.