शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात पहिली व आठवीच्या पुस्तकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 12:45 IST

दोन लाख 33 हजार विद्यार्थी : 72 टक्के पुस्तकांचा पुरवठा, पहिल्या दिवशी वाटपाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पहिली व आठवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे पुस्तकांची छपाई उशिरा झाली. परिणामी या दोन वर्गाची पुस्तके अद्यापही उपलब्ध झालेली नसल्याचे चित्र आहे. यामुळे आतार्पयत 72 टक्के पुस्तके प्राप्त झाली आहेत. दरम्यान, यंदा दोन लाख 33 हजार 645 विद्याथ्र्यासाठी 12 लाख 19 हजार 661 पुस्तके नोंदविण्यात आली आहेत. सर्व शिक्षा अभियानतर्फे दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्याथ्र्याना मोफत पाठय़पुस्तके पुरविण्यात येतात. या वर्गातील कोणताही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहू नये आणि त्याला केवळ पुस्तकांअभावी शिक्षणात अडचणी येऊ नये यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठय़पुस्तक ही योजना सुरू केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या        सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित खासगी शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्याथ्र्याना मोफत पुस्तके पुरविण्यात येणार आहे.दोन महिने आधी मागणीशैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दोन महिने आधीपासून पुस्तक संचाची नोंदणी करावी लागत असते. यंदा पाठय़पुस्तके मंडळाने थेट ऑनलाइन पद्धतीने मागणी नोंदविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुकास्तरावरून ऑनलाइन मागणी नोंदविण्यात आली होती. त्यामुळे यंदा वेळेवर पुस्तके पोहचतील व विद्याथ्र्याना मिळतील असे नियोजन करण्यात आले आहे. संख्या वाढलीयंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 टक्के जादा पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. यंदा दोन लाख 33 हजार 645 विद्याथ्र्याकरिता पुस्तक मागणी करण्यात आली आहे. त्यात  पहिली ते पाचवीच्या एक लाख 49 हजार 474 विद्यार्थी, तर सहावी ते आठवीच्या 84 हजार 171 विद्याथ्र्याचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्यात 72.11  टक्के, नवापूर तालुक्यात 53.80, शहादा तालुक्यात 90.19, तळोदा तालुक्यात 54.71, अक्कलकुवा तालुक्यात 60.19, धडगाव              तालुक्यात 85.02 टक्के अशी एकूण 72.02 टक्के पुस्तके उपलब्ध झाली आहेत. थेट गटसाधन केंद्रात यंदापासून थेट पुण्याहून तालुकास्तरावर गटसाधन केंद्रात पुस्तके पोहच करण्यात आली आहेत. नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत ही पुस्तके  वाहतूक केली गेली               आहे. पूर्वी जिल्हास्तरावर पुस्तके येत होती.    तेथून तालुकास्तरावर नेली जात होती. त्यात वेळ व पैसाही खर्च होत       होता.