शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

विनय गौडा यांची सातारा जि.प.च्या सीईओपदी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. १७ महिन्यांपूर्वी त्यांची तळोदा प्रकल्प अधिकारी पदावरून येथे बदली झाली होती. गौडा यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. गौडा यांनी आपल्या कार्यकाळात घरकुल योजना, झिरो पेडन्सी, पाणी पुरवठा योजनांची कामे चांगली केली. आंतरजिल्हा शिक्षक बदलीच्या राज्य समन्वयक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी दुपारी येथे प्राप्त झाले. गौडा यांनी १९ फेब्रुवारी २०१९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता. त्या आधी ते तळोदा येथे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून दिड वर्ष काम पाहिले होते.गौडा यांनी आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घरकुल योजनेवर भर दिला होता. योजना प्रभावीपणे राबविणारी नंदुरबार जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली होती. याशिवाय पाणी नमुने संकलन व तपासणीत देखील जिल्हा परिषद राज्यात सतत दोन वर्ष अव्वल ठरली आहे. झिरो पेडन्सीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा व जिल्हाअंतर्गत बदलीच्या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या राज्यस्तरीय समितीत ते प्रमुख अधिकारी होते. यंदाच्या आॅनलाईन बदल्यांचे मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले.त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक काळ हा आचारसंहितेत गेला होता. त्यात लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुका झाल्याने सहा ते सात महिने आचारसंहितेत गेले. असे असतांनाही त्यांनी जास्तीत जास्त निधी खर्च करण्यावर व योजना राबविण्यावर देखील विनय गौडा यांनी भर दिला होता.पदभार प्रभारी अतिरिक्त सीईओंकडे४अतिरिक्त सीईओंचे पदही रिक्त आहे. हा पदभार ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्याकडे आहे. आता सीईओंचा प्रभारी पदभारही त्यांच्याकडे राहणार आहे. नवीन सीईओ कुणाची नेमणूक होते याकडे आता लक्ष लागून आहे.