शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भितीपोटी लोभाणी येथील ग्रामस्थांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 12:52 IST

लोभाणीत अस्वलांचा वावर वाढला : ग्रामस्थ सोबत बाळगताय लाठय़ा-काठय़ा

तळोदा :  लोभाणी ता़ तळोदा येथून जाणा:या ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाजवळ अस्वलांचे वास्तव्य असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत़ रात्रीच्या वेळी येथील ग्रामस्थांकडून परिसरात पहारा देण्यात येत आह़ेरविवार 3 रोजी रात्री लोभाणी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाच्या मृत्यू झाला होता़ या वेळी प्रत्यक्षदर्शीकडून 3 ते 4 अस्वल पाहण्यात आले होत़े येथील हिंस्त्र पशु पाण्याच्या शोधात इतरत्र भटकंती करीत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े या पाश्र्वभूमिवर ग्रामस्थांमध्ये  भितीचे वातावरण आह़े दररोज ठिकठिकाणी लाठय़ा-काठया हातात घेऊन महिला-पुरुष रात्रीच्या वेळी परिसरात वावरताना दिसून येत आह़े केव्हानेच हिस्त्रपशु येईल याची शाश्वती नसल्याने अनेक ग्रामस्थ दुचाकी, सायकल आदींना काठय़ा अडकवून ठेवत आहेत़लोभाणी गावशिवाराच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार अस्वलाच्या वावर असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी तसेच दिलीप गावीत यांना दिसले आह़े त्यांनी ही बाब इतर ग्रामस्थांना सांगितली होती़ मात्र खोटी अफवा पसरवत असल्याचा समज करून ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. परंतु रविवारी लोभाणी गावाजवळ अनेक ग्रामस्थांना तीन ते चार अस्वल दिसून आले तसेच त्यातील एका अस्वलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यूही झाला असल्याने ग्रामस्थांसमोर सत्य आल़े त्यानंतर मात्र ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आह़े रात्रीच्या वेळी शेतशिवारात पाणी देण्यासाठी जाताना जमाव करुन शेतकरी जात आहेत़ त्याच प्रमाणे प्रत्येकाच्या हातात लाठय़ा-काठय़ा दिसून येत आह़े अस्वलाचा अपघातात मृत्यू झाल्या दिवसापासून दररोज अंधार पडल्यावर गावात कुठेना कुठे तरी हिंस्त्रपशुंकडून घुसखोरी झाल्याच्या घटना वारंवार धडत आहेत़ परिणामी ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली असून लहान्यांपासून तर मोठय़ांर्पयत सर्वच हातात लाठय़ा-काठय़ा घेऊन ठीकठिकाणी बसून राहत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, याची गांभिर्याने दखल घेऊन वनविभागाने ठोस पाऊल उचलून उपाययोजना करणे गरजेचे आह़े हिंस्त्र प्राण्याचा हल्यात जीवित हानी होण्याच्या घटना या आधिही घडल्या आहेत़ त्यामुळे एखाद्या दुर्घटनेची वाट न बघता प्रशासनाकडून त्वरीत कार्यवाही अपेक्षीत आह़े