शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘रॅन्समवेअर’च्या धास्तीने नंदुरबार जिल्हा प्रशासन, बँकांमध्ये सतर्कता

By admin | Updated: May 15, 2017 18:18 IST

शासकीय कार्यालयांसह बँकांमध्येही विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 15 -  सायबर हल्ल्याची चर्चा आणि त्यासंदर्भात फिरणारे मेसेज लक्षात घेता नंदुरबार येथे शासकीय कार्यालयांसह बँकांमध्येही विशेष दक्षता घेण्यात येत आहे.  जिल्हा प्रशासनाच्या सर्व संगणक प्रणालींचे नियंत्रण जिल्हा सूचना व विज्ञान कार्यालयातून करण्यात येत आहे. याशिवाय सर्व संबधित कार्यालयांनाही सूचना देण्यात आल्या. शहरातील निम्मे एटीएमदेखील बंद होते.    सायबर हल्ल्यासंदर्भात सोमवारी आलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावर फिरणारे मेसेज यामुळे लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.   आठवडय़ाचा पहिला दिवस ंअसूनही एटीएममध्ये शुकशुकाट  दिसून आला. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या सर्वच कार्यालयांमध्ये देखील याबाबत सतर्कता बाळगण्यात आली होती.  जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांच्या संगणक प्रणालींचे नियंत्रण हे जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी कार्यालयाअंतर्गत   करण्यात येते. अधिकारी धर्मेद्र जैन यांनी याबाबत सोमवारी सकाळीच   सर्व विभाग प्रमुखांना सुचीत करून आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनीदेखील याबाबत जैन यांच्याकडून माहिती जाणून घेतली. सर्व विभागातील संगनकांमधील अॅण्टी व्हायरस दुपार्पयत अपडेट करण्यात आले.याशिवाय विना नावाचा आणि माहितीचा मेल आला असल्यास तो ओपन करू नये. नवीन वेबसाईट देखील ओपन करण्याचे काही दिवस टाळावे. अनोळखी मेल ओपन केला     गेल्यास काही अडचणी आल्यास तात्काळ जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असेही आवाहन धर्मेद्र जैन यांनी केले आहे.सायबर सेलही सतर्कजिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेललाही सतर्क करण्यात आले    आहे. अशा प्रकारची तक्रार  कुणाकडून आल्यास तात्काळ त्याची माहिती जिल्हा सुचना व विज्ञान कार्यालयात कळविण्याचे सांगण्यात आले आहे.बँकांचे सॉप्टवेअर अपडेटस्टेट बँकेचे सॉप्टवेअर वेळोवेळी अपडेट करण्यात येत असल्यामुळे रॅन्समवेअरचा धोका नसल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. असे असले तरी सर्व संबधितांना काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. स्टेट बँकेचे एटीएम देखील सुरळीत सुरू होते. इतर सर्वच बँकांमधील व्यवहार देखील ऑनलाईन सुरळीत सुरू होते. परंतु आयडीबीआय, बँक ऑफ इंडिया, अॅक्सीस बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँकेचे एटीएम दुपारनंतर बंद दिसून आले. जे एटीएम सुरू होते. त्या ठिकाणी फारशी गर्दी दिसून येत नव्हती.