शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

Vidhan Sabha 2019 : आमदारकीपासून जिल्ह्यातील महिला वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एकाही महिलेला आमदार होण्याचा मान मिळालेला नाही. आतार्पयंतच्या निवडणुकीत मात्र 16 महिलांनी उमेदवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील एकाही महिलेला आमदार होण्याचा मान मिळालेला नाही. आतार्पयंतच्या निवडणुकीत मात्र 16 महिलांनी उमेदवारी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील केवळ एकच महिला उमेदवारी करीत आहेत.नंदुरबार जिल्ह्यात पूर्वी पाच जागा होत्या. नंतरच्या पुनर्रचनेत चार जागा झाल्या. आतार्पयतच्या एकुण 11 निवडणुकीत फक्त 16 महिला उमेदवारांनी उमेदवारी केली आहे. त्यापैकी कुणालाही यश आले नाही. पहिल्यांदाच 1972 मधील निवडणुकीत शहादा मतदारसंघातून भुरीबाई सरदार चव्हाण यांनी आरपीआयकडून उमेदवारी केली होती. 1978 मध्ये धडगाव मतदारसंघातून भरुबाई मानसिंग शेमळे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. 1980 च्या निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघातून काँग्रेस यू कडून नलीनीबाई तुकाराम गावीत यांनी निवडणूक लढली. त्यावेळी या मतदारसंघात काँग्रेस आय चे उमेदवार व त्यांच्यात सरळ लढत होती.  1985 च्या निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून निजूबाई गावीत यांनी अपक्ष उमेदवारी केली. 1995 च्या निवडणुकीत दोन उमेदवार होत्या. त्यात नवापूर मतदारसंघातून मिरा किशोर वसावे यांनी दूरदर्शी पार्टीकडून तर शहादा मतदारसंघात कमल निंबा ठाकुर यांनीही अपक्ष उमेदवारी केली. 2004 च्या निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून दुर्गाबाई पाडवी, सविता रमाकांत गांगुर्डे यांनी अपक्ष तर तळोदा मतदार संघात सावित्री मगन पाडवी यांनीही अपक्ष उमेदवारी  केली. 2009 च्या निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात भाजपतर्फे सुहासिनी नटावदकर यांनी उमेदवारी केली होती. त्यांना दुस:या क्रमांकांची मते मिळाली होती. शहादा मतदारसंघात प्रमिला केलसिंग पावरा यांनी अपक्ष तर सावित्री मगन पाडवी यांनी राष्ट्रवादी सेनेकडून उमेदवारी केली होती.  2014 च्या निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून ममता रवींद्र वळवी यांनी मनसेतर्फे तर शहादा मतदार संघात सावित्री मगन पाडवी यांनी बसपातर्फे उमेदवारी केली होती. शिवाय नवापूर मतदारसंघात शिवसेनेतर्फे ज्योत्सना दिलीप गावीत यांनी तर अपक्ष म्हणून उर्मिला वळवी यांनी उमेदवारी केली होती.यंदाच्या निवडणुकीत केवळ नंदुरबार मतदारसंघातून वंचीत बहुजन आघाडीतर्फे दीपा वळवी यांनी उमेदवारी केली आहे.

जिल्ह्यातून एकाही महिलेला आमदारकीची संधी मिळाली नसली तरी जिल्ह्यातील कन्येने इतर ठिकाणाहून आमदारकी मिळविली आहे. माजी खासदार माणिकराव गावीत यांच्या कन्या निर्मला गावीत यांनी इगतपूरी मतदारसंघातून दोन वेळा काँग्रेसतर्फे उमेदवारी करून निवडून आल्या आहेत. यंदा त्या शिवसेनेकडून उमेदवारी करीत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील कन्या डॉ.हिना गावीत या नंदुरबारच्या तर रक्षा खडसे या रावेरच्या विद्यमान खासदार आहेत.