शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

Vidhan Sabha 2019: संशयाच्या राजकारणाने उमेदवारांची धडधड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:12 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत नंदुरबार जिल्ह्यात कधी नव्हे इतकी राजकीय उलथापालथ ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत नंदुरबार जिल्ह्यात कधी नव्हे इतकी राजकीय उलथापालथ झाल्याने नेत्यांच्या भूमिकेबाबत संशयाचे वलय निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्षांतराच्या लाटेत कोण कुठल्या पक्षात गेले असले तरी नेते पक्षाच्या उमेदवारासाठीच प्रामाणिकपणे काम करतील का? याबाबतही सर्व सामान्य जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. या चर्चेत उमेदवारांची अक्षरश: झोप उडाली असून, त्यांनाही राजकीय समीकरण जोडणे अवघड होत आहे.नंदुरबार जिल्ह्यात पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच सत्तेसाठी संघर्ष सुरू होता. डॉ.विजयकुमार गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे राजकारण डॉ.गावीत विरूद्ध काँग्रेस असेच पाहायला मिळाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी हे दोन आमदार निवडून आले होते. तर काँग्रेसचे सुरूपसिंग नाईक व के.सी. पाडवी हे विजयी झाले होते. त्यात काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा मोठा वाटा होता. आता या निवडणुकीत पूरते चित्र बदलले आहे. कारण काँग्रेसची धुरा सांभाळणा:या माणिकराव गावीत, सुरूपसिंग नाईक, के.सी. पाडवी, चंद्रकांत रघुवंशी या चौकटीतून माणिकराव गावीत व चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षांतर करून माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत भाजपाची उमेदवारी करीत आहेत. तर रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दुसरीकडे भाजपाच्या दोन आमदारांपैकी उदेसिंग पाडवी यांना भाजपाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व मतदार संघ सोडून नंदुरबार विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. या नेत्यांचे पक्ष कुठलेही असले तरी वैयक्तिक मैत्री-संबंधाचा पूर्व इतिहास पाहता रघुवंशी आणि उदेसिंग पाडवी यांची जवळीक होती. तर रघुवंशी आणि माणिकराव गावीत व सुरूपसिंग नाईक यांचेही घनिष्ठ संबंध होते. अशा स्थितीत रघुवंशींनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नंदुरबार विधानसभा मतदार संघात ते भाजपशी युती असलेल्या महायुतीचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांना भक्कमपणे मदत करतील की आतून उदेसिंग पाडवी यांना प्रोत्साहन देतील? हा प्रश्न चर्चेचा ठरला आहे. या संदर्भात रघुवंशी यांनी डॉ.गावीत यांच्या उपस्थितीत गुरुवारी नंदुरबार ेयेथे त्यांच्या समर्थक कार्यकत्र्याची बैठक घेवून युतीचा धर्म पाळण्याचा संदेश दिला आहे.  दुसरीकडे नवापूर मतदार संघातील निम्मा भाग नंदुरबार तालुक्यातील आहे. याभागात रघुवंशींचे समर्थक मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे या भागात ते युतीचे उमेदवार भरत गावीत यांना मदत करतील की, आतून काँग्रेसचे शिरीष नाईक यांना? हा प्रश्नही जनमानसात चर्चेचा ठरला आहे. असाच प्रश्न खासदार डॉ.हिना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्याबाबतही उपस्थित केला जात आहे. आमदार गावीत यांचे बंधू माजी आमदार शरद गावीत हे अपक्ष म्हणून नवापूरमधून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे खासदार हिना गावीत व आमदार डॉ.गावीत हे नवापूर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार भरत गावीत यांच्या प्रचारासाठी प्रभावीपणे काम करतील की, आतून शरद गावीत यांना पाठींबा देतील? हा प्रश्नही कार्यकत्र्याना सतावत आहे. एकीकडे नाते संबंधाचे हे चित्र आहे तर दुसरीकडे अक्कलकुवा मतदार संघात शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असला तरी भाजपाच्या उमेदवाराने बंडखोरी केली आहे. अक्कलकुवा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रचाराची धुरा चंद्रकांत रघुवंशी यांनी सांभाळली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते व जिल्ह्यातील नेते प्रचारात कशा पद्धतीने योगदान देतात यावरही शिवसेनेच्या नेत्यांनी भूमिका अवलंबून राहणार आहे. बुधवारी शहादा येथील भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत मात्र रघुवंशी किंवा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे हे उपस्थित नव्हते. हे दोन्ही नेते हेलिपॅडवरच मुख्यमंत्र्यांना भेटून धडगावकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. पण सभेत न आल्याने त्याबाबत सभास्थळी कार्यकत्र्यामध्ये एकच चर्चा होती.  या चर्चेतून शिवसेना-भाजप युतीच्या सर्वच कार्यकत्र्याची मने अजून आतून जुळली नसल्याचे चित्र समोर येत आहे. अशा सा:याच संशयाच्या राजकारणात उमेदवारही संभ्रमीत अवस्थेत आहेत. नेत्यांबरोबरच कार्यकर्तेदेखील वेगवेगळ्या गटा-तटाचे असल्याने प्रचारासाठी एका कार्यकत्र्याला सोबत घेतल्यास त्याच्या विरोधातील कार्यकर्ता नाराज होतो. प्रत्येकाची मनधरणी करण्यासाठी उमेदवारांचीही मोठी कसरत होत आहे. त्यातच या निवडणुकीत निम्मे उमेदवार नवीन आहेत. त्यामुळे त्यांना त्यासाठी अधिकच प्रय} करावा लागत आहे. अशा या संशयीत वातावरणात पक्षातील नेते कार्यकर्ते आपल्यासाठी खरच प्रामाणीक पणे काम करतील का? हा प्रश्न उमेदवारांनाही सतावत असल्याने त्यांची निवडणुकी संदर्भातील धडधड अधिकच वाढली आहे.