शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई पोर्टल व ‘कॅरी फॉरवर्ड’ विद्याथ्र्याची होणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:09 IST

मोफत प्रवेश : गटशिक्षण अधिकारी स्तरावर पथक नेमण्याचे आदेश

नंदुरबार : 25 टक्के मोफत प्रवेश अंतर्गत आरटीई पोर्टल वर नोंद असलेले विद्यार्थी, प्रत्यक्षात शाळेत प्रवेशित विद्यार्थी व मागील वर्षी कॅरी फॉरवर्ड करण्यात आलेले विद्यार्थी यांची पडताळणी करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात आले आह़े यासाठी गटशिक्षण अधिकारी स्तरावर तपासणी पथकाची नियुक्ती करण्याचेही आदेश देण्यात आले आह़े25 टक्के मोफत प्रवेशअंतर्गत जिल्ह्यात सुमारे साडेचारशे विद्याथ्र्याचा कोटा ठरवून दिला आह़े परंतु त्यापैकी निम्म्या जागा रिक्त आहेत़ जिल्ह्यात 25 टक्केअंतर्गत तीन प्रवेश फे:या घेण्यात आल्या होत्या़ परंतु ठराविक इंग्रजी माध्यमातील शाळांकडेच पालकांचा अधिक ओढा असल्याने मोठय़ा संख्येने जागा रिक्त असतात़ प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून संबंधित शाळांना 25 टक्केअंतर्गत प्रवेशित विद्याथ्र्याचा शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करावयाची आह़े परंतु आरटीई पोर्टल, प्रत्यक्ष शाळेत प्रवेशित विद्यार्थी व मागील वर्षातील कॅरी फॉरवर्ड विद्यार्थी                यात अनेक वेळा तफावत आढळून             येत असत़े त्यामुळे शिक्षण विभागाकडून याबाबत गटशिक्षण अधिकारी              यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमत विद्याथ्र्याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत़ शासनाने याबाबत 1 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढून याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत़ दरम्यान, तपासी पथक किंवा समितीतर्फे प्रत्यक्ष शाळेत जावून 25 टक्केअंतर्गत प्रवेशित विद्याथ्र्याची हजेरी घेऊन पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आह़े गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्राथमिक शिक्षणाधिका:यांनी यासाठी पथके, समिती नेमण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत़ 25 टक्के अंतर्गत मोफत प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याचा शैक्षणिक शुल्क शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांना देण्यात येत असतो़ त्यासाठी संबंधित शाळा 25 टक्के मोफतअंतर्गत प्रवेशित असलेल्या विद्याथ्र्याचा तपशिल तसेच शैक्षणिक शुल्क आदींचा अहवाल गटशिक्षणाधिकारी स्थरावर पाठवत असत़े याची पडताळणी करुन हा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठवून सर्व पडताळणी झाल्यावर शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती निधी संबंधित शाळेच्या खात्यावर जमा करण्यात येत असतो़ तत्पुर्वी जिल्ह्यातील एकूण किती शाळांना किती शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करायची आहे, हे प्रमाणित करण्याचे काम प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना करावयाचे असत़े  दरम्यान, या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीमध्ये केवळ शैक्षणिक शुल्काचीच रक्कम शाळांना अदा करण्यात येत असत़े त्यात प्रवास भाडे तसेच इतर खर्च अंतभरूत नसतो़ तपासणी पथकाकडून मोफत प्रवेशित विद्याथ्र्याच्या पालकांचे उत्पन्न, घर व शाळेतील अंतर, जातीचा दाखला आदींची तपासणी करणेही आवश्यक असत़े वर्गात जावून 25  टक्के अंतर्गत प्रवेशित विद्याथ्र्याची हजेरी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आह़े  बहुतेक वेळा विद्याथ्र्याची वास्तविकता व सादर करण्यात आलेली  माहिती यात तफावत असल्याचे आढळत़े