लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोरीट गावाजवळ अपूर्ण रस्ताकामाचा फटका वाहनधारकांना बसला असून पावसामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आह़े यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आह़े याठिकाणी सोमवारी सकाळी ट्रक फसल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती़ सेंधवा ते विसरवाडी या मार्गाचे रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आले आह़े नंदुरबार ते प्रकाशा दरम्यान कोळदा ते कोरीट गावाच्या अलीकडेर्पयत रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण पूर्ण झाले आह़े परंतू कोरीट फाटय़ाजवळील नाल्याजवळ केवळ मातीचा भराव करण्यात आला होता़ दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नाल्याच्या पाण्यामुळे रस्त्याच्या कडेला भगदाड पडले होत़े रविवारी रात्री पाणी जास्त झाल्याने रस्त्यार्पयत भगदाडाची रुंदी वाढून रस्त्यात पाणी साचल़े यातून सोमवारी सकाळी येथे रिक्षा उलटली़ तसेच अवजड ट्रक फसून नंदुरबार ते शहादा दरम्यान होणारी वाहतूक थांबवण्यात आली़ सायंकाळर्पयत पाऊस सुरु असल्याने खड्डा बुजवला गेला नव्हता़ सकाळी चार तास मार्गावरील वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला़ लगतच्या यावल आणि कोरीट मार्गाने वाहनांची नंदुरबारकडे वाहतूक सुरु होती़ रात्रीही येथे वाहने अडकत होत़े
चिखलमय रस्त्यांवर वाहने उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:26 IST