नंदुरबार येथील डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त ऑनलाइन व ऑफलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी होत्या. कार्यक्रमास पर्यवेक्षक विपुल दिवाण उपस्थित होते. प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींनी शैक्षणिक कामकाजाचा अनुभव घेतला. विद्यार्थिनी मुख्याध्यापिका म्हणून जाग्रुती अहिरराव व उपमुख्याध्यापिका प्रियांशू चौधरी या विद्यार्थिनींनी शालेय काम सांभाळले. यावेळी २५ विद्यार्थिनींनी अध्यापनाचे काम पाहिले. या उपक्रमासाठी नंदिनी बोरसे व संजय चौरे यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत पाचवी ते सहावीच्या गटात प्रथम मनस्वी जगदीश नाईक, द्वितीय श्रावणी जगदीश बच्छाव, तृतीय विभागून जान्हवी महेंद्र पवार व भूमिका मुकेश पाटील तर उत्तेजनार्थ खुशी कमलाकर सोनार व आर्या यतिन चव्हाण आली. सातवी ते आठवीच्या गटात प्रथम चंचल केशव मराठे, द्वितीय भूमी किशोर पवार, तृतीय श्रध्दा दीपक चौधरी तर उत्तेजनार्थ विभागून दिशा धनंजय पाटील व राधिका दीपक सोनार आली. नववी ते १० वीच्या गटात प्रथम कल्याणी संदीप परदेशी, द्वितीय दीप्ती संजय ठाकरे, तृतीय वैष्णवी अशोक मच्छले, उत्तेजनार्थ योगिता संजय कुंभार आली. यशस्वी सर्व विद्यार्थिनींचे मुख्याध्यापिका, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. या स्पर्धेचे परिक्षण नंदिनी बोरसे, चंद्रशेखर चौधरी व किसन पावरा यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना ऑनलाइन व ऑफलाइन प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कला, विज्ञान महिला महाविद्यालय, शहादा.
शहादा येथील कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्र.प्राचार्य डॉ.भारत चाळसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अनिल साळुंके, ग्रंथपाल डॉ.प्रसन्ना डांगे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी एच.आर. कुलकर्णी, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एम. पाटील, प्रा.बी.आर. राजपूत, प्रा.ए.बी. अहिरे, सुधाकर नाईक, राजेश राठोड, जगदीश राठोड, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अनिल साळुंके तर आभार डॉ.प्रसन्ना डांगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्या मंदिर, नंदुरबार
नंदुरबार येथील शालिनीताई जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर व बाल मंदिर यांच्या समन्वयाने शिक्षक दिनानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बाल मंदिराच्या मुख्याध्यापिका रंजना जोशी उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून रत्ना पाटील होत्या. त्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. दीपाली पाटील व रंजीता वळवी यांनी ऑनलाइन शिक्षणात शिक्षकाची भूमिका, या विषयावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजना जोशी व मुख्याध्यापक सुनील खैरनार यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रीतीबाला पाटील, शीतल राजपूत, प्रणाली बोरकर, अर्चना चौधरी, तरुलता कुलकर्णी, महेश साठे, सीमा पाटील, दीपाली पाटील, आनंदा सोनवणे, रिना सोनवणे, कृष्णामाई उफाळे, रंजना जोशी, रत्ना पाटील, मीताली अर्थेकर, सायली मुळे, लक्ष्मी वडाळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन रिना सोनवणे तर आभार सीमा पाटील यांनी मानले.