भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी व भाजपा शहादातर्फे ७५ व्या स्वतंत्र्यदिवसानिमित्ताने कळंबू, ता. शहादा येथील शहीद नीलेश महाजन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी शहीद नीलेश महाजन यांच्या बालपणपासून तर शहीद झाले तेव्हा पर्यंतचा सजीव देखावा निर्माण करण्यात आला होता. शहीद नीलेश सोबत त्याचा मित्र हरीश महाजन, लोणखेडा याने त्याला खूप साथ दिली. गोळी लागल्यापासून आठ महिने हरीश महाजन हा दवाखान्यात त्याची सेवा करीत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून खुल्या गाडीत शहीद महाजन यांच्या कुटुंबीयांना बसवून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार राजेश पाडवी, प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, पालिकेचे गटनेते मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, अजय शर्मा, डॉ. वसंत पाटील, शहीद महाजन यांचे भाऊ दीपक महाजन, परिवार व सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजित चौधरी तर आभार पंकज सोनार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, सांस्कृतिक आघाडी जिल्हा अध्यक्ष निकेश राजपूत, शहर अध्यक्ष विनोद जैन, उपाध्यक्ष पंकज सोनार, जिल्हा संयोजक कमलेश जांगीड, आकाश राजपूत, अक्षय अमूर्तकर, वैभव सोनार, हितेंद्र वर्मा, जयेश देसाई, सनी सोनार, जितेंद्र शिकलीकर, नंदा सोनवणे, रोहिणी भावसार, पूजा पाटील, भावना लोहार, मेघा खारकर, किन्नरी सोनार, कल्पना पंड्या, अनामिका चौधरी, वंदना भावसार यांच्यासह विविध आघाड्याच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, शहादा
शहादा शहरातील उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयात प्रांत अधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी महेश घोगरे, शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, नगरपालिका गटनेते मकरंद पाटील, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती अभिजित पाटील, शहरातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.
विश्रामकाका शैक्षणिक संकुल, शहादा
शहादा शहरातील डॉ. विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुलात शहादा तालुका एज्युकेशन संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन हिरालाल पाटील, आजीव सदस्य नरेंद्र शहा, प्राचार्य आय.डी. पाटील, सेवानिवृत्त प्रा. एल. एन. चौधरी, प्रा. एच. एम. पाटील उपप्राचार्य एस.जे. पटेल, विविध शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
दाऊदी बोहरा वसाहत, शहादा
शहादा शहरातील दाऊदी बोहरा वसाहतीत प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा उत्सव साजरा करण्यात आला. दाऊदी बोहरी समाजाच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. यावर्षी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती अभिजित पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी दाऊदी बोहरा समाजाचे मौलवी शेख मुस्तफा रायपूरवाला, शेख जोएब इज्जी, इस्माईल राजा मोहम्मद इज्जी, सकलेन नुरानी, कुरेश बद्री, मुस्तफा बद्री, कौसर आरझु, हुजेपा आरिफ, तसेच अहबब कमिटीचे सर्व सदस्य शहरातील अँड.सरजु चव्हाण, प्रा.आर.टी. पाटील, मानक पाटील, नंदुरबार जिल्हा ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमइन एएमआयएम या संघटनेचे जिल्हाध्यक्ष जीशान मंजूर पठाण, नगरसेवक वसीम तेली, कुतबु बद्री यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
डोंगरगाव परिसरात वृक्षारोपण
शहादा : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत येथील डोंगरगाव रस्त्यालगत आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या वर्षभरात भारतभूमीच्या सीमेवर देश संरक्षणासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विजय चौधरी, सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, शहादा नगरपालिकेचे गटनेते मकरंद पाटील, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन रवींद्र रावळ, शहादा नगरपालिकेचे माजी नगरसेवक के.डी. पाटील, मंदाणा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल भामरे आदी उपस्थित होते. आमदार पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले.