अनुदानित आश्रमशाळा, जळखे
नंदुरबार तालुक्यातील जळखे येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळेत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष कृष्णदास पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्थ केदारनाथ कवडीवाले, पाटीलभाऊ माळी, संस्थेचे सल्लागार रंगनाथ नवले, ललित कुमार पाठक, जळखे ग्रामपंचायत सदस्य शिरीष वसावे, पोलीस पाटील सुलोचना पाडवी, संस्थेच्या सर्व युनिटचे प्रमुख व त्यांचे विकास सहयोगी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. तसेच इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.
रोझवा पुनर्वसन
रोझवा पुनर्वसन, ता. तळोदा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सरदार पाडवी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास उपसरपंच वंतीबाई तडवी, पोलीस पाटील करुणाबाई पावरा, माजी सरपंच जयराम पावरा, नमा पावरा, रमेश पावरा, बुसरा वसावे, शिवाजी पावरा, वैद्यकीय अधिकारी किरण पवार, आरोेग्य सेविका अलिशा गावित, वैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मणिलाल नावडे, प्रशांत बिरारी, सुरेश पाटील, शरद गांगुर्डे, रवींद्र पाडवी, चित्रा वळवी, जयवंती चौधरी, सुनंदा सुकणे, विनायक गावित, रवींद्र मुसणे, रमेश राऊत, रायसिंग वसावे, ग्रामसेवक भिका भलकार यांनी परिश्रम घेतले.