कळंबू, ता.शहादा येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीत माजी सैनिक संभाजी बोरसे व जिल्हा परिषद मराठी शाळेत माजी सैनिक जयवंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुवर्णाबाई बोरसे, उपसरपंच वासुदेव बोरसे, ग्राम विस्तार अधिकारी एम.बी. चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य हिम्मतराव बोरसे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नवल देवरे, ग्रामपंचायतींचे सदस्य, जिल्हा परिषद शाळा शिक्षक वर्ग, विविध संस्था, समितींचे पदाधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
एस.ए.मिशन प्राथमिक शाळा, मुंदलवड
मुंदलवड, ता.धडगाव येथील एस ए मिशन प्राथमिक शाळेत ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ध्वजवंदन संजय गार्दी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक उपशिक्षक संजय पाटील यांनी केले. या वेळी मुख्याध्यापक रविकांत वळवी यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. आभार रविकांत वळवी यांनी मानले. याप्रसंगी राहुल वळवी, आंतरसिंग पाडवी तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.
आष्टे
आष्टे, ता.नंदुरबार येथील जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समिती सदस्य कमलेश महाले, पोलीस दूरक्षेत्रात पोलीस उपनिरीक्षक माळी, ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी देवेंद्रसिंग राजपूत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, औट पोष्टचे अधिकारी,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बोरचक
बोरचक, ता.नवापूर येथे टीम ट्रस्ट खाजगी प्राथमिक शाळा व जीवन विकास माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी प्राथमिकचे मुख्याध्यापक भिका मोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी आदिवासी जीवन विकास मंडळाचे अध्यक्ष विरजी वळवी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सत्तेसिंग वळवी, निवृत्त केंद्रप्रमुख सेगजी वळवी, माध्यमिक मुख्याध्यापक सुनील भामरे, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते. या वेळी तंबाखू मुक्त शाळा व गांव याची सामुदायिक शपथ घेण्यात आली. सूत्रसंचालन हिमांशु बोरसे यांनी केले.