शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जलदिनानिमित्त जल दौडसह विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आणि लोकजागृती आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा असे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आणि लोकजागृती आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले. जलसाक्षरता सप्ताहाचा जलदौडने समारोप करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.  पंचायत समिती सभागृहात आयोजित जलजागृती सप्ताहाच्या समारोप उपक्रमात ते बोलत होते. त्यापूर्वी जलदौड काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, देवेंद्र जोशी, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सांगितले, पाणी हा महत्वाचा घटक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाबाबत सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभाग आणि लोकजागृतीला महत्व दिले पाहिजे. जलबचतीचा संदेश जनतेर्पयत पोहोचवून अधिकाधिक परिवर्तनावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विनय गौडा यांनी सांगितले, दिवसेंदिवस भुगर्भातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाण्यासाठीच्या संघर्षात वाढ होत आहे. पाण्याशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे पाणी बचतीचे महत्व प्रत्येकाने जाणावे आणि त्यादृष्टीने काम करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. प्रास्ताविक देवेंद्र जोशी यांनी केले. सकाळी जलजागृती दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी व सर्व अधिका:यांनी त्यात सहभाग घेतला.