अभिनव विद्यालय, नंदुरबार
अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन ॲड.प्रभाकर चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य प्रमोद पाटील व प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ शिक्षिका राजश्री गावीत उपस्थित होत्या. प्रारंभी अध्यक्षांचा हस्ते बालशहिद शिरीषकुमार व जननायक बिरस़ांमुडा यांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्त्यांनी मनोगतातून क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवसांचे महत्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाला प्राचार्य शरद पाटील, पर्यवेक्षक प्रल्हाद पाटील, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार तारकेश्वर पटेल यांनी मानले.
प्रकाशा येथे प्रतिमा पूजन
प्रकाशा, ता.शहादा येथे विश्व आदिवासी व क्रांती दिनानिमित्त क्रांतिवीर बिरसा मुंडा, वीर एकलव्य, खाज्या नाईक, तंट्या भिल आदींचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी माजी सरपंच सुदाम ठाकरे, कैलास जुलाल भिल, शत्रुघ्न माळीच, विनोद ठाकरे, कौतिक सोनवणे, सागर सोनवणे, आकाश सोनवणे, गणेश सोनवणे आदी उपस्थित हाेते.
एम.के. रघुवंशी विद्यालय, आसाणे
नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथील एम.के. रघुवंशी माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.पी. मिरत्री होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी सखाराम नाईक, के.पी. भामरे, एम.एफ. शेलार, एम.एफ. धनगर, एल.एच. बागुल यांनी जागतिक आदिवासी गौरव दिना याविषयी मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापक एस.पी.मिरत्री यांनी ऑगस्ट क्रांतीचे महत्व सांगून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश शासनाला हादरून सोडणाऱ्या क्रांतीवीर बिरसा मुंडा, वीर खाज्या नाईक, वीर तंटया भिल यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक एल.एच. धनगर यांनी केले तर आभार एम.एफ. शेलार यांनी मानले. कार्यक्रमासाठी ए.एन.पाटील, आर.के. पाटील, के.के. पाटील, एस.यु. नाईक, डी.डी. पाटील यांनी परिश्रम घेतले.