जुनवानी गावाजवळ बाहागोऱ्या देवस्थानाच्या पायथ्याशी श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्यात आला आहे. जुनवाणी व सरी (खालपाडा) या गावासह परिसरातील पशुपालकांना आपल्या जनावरांना तसेच जंगली प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी व जनावराची भटकंती होऊ नये या उद्देशाने हा वनराई बंधारा तयार करण्यात आला. यामुळे जुनवाणी, खालपाडा गावातील प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या कामासाठी कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार व मोलगी परिसर सेवा समितीचे मार्गदर्शन लाभले. वनराई बंधारा बांधण्यासाठी जुनवानी गावातील शेतकरी ओल्या इरमा पाडवी, दमण्या पाडवी, रायसिंग पाडवी, ढोग्या महाराज, रामजी पाडवी, वाहऱ्या पाडवी, उदेसिंग पाडवी, चंद्रसिंग पाडवी, रामा वसावे, धीरसिंग वसावे, नोबल्या गुरुजी, नितीन पाडवी, राज्या पाडवी, वेस्ता पाडवी यांच्यासह ग्रामस्थांनी श्रमदान केले.
जुनवाणी गावाजवळ नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:20 IST