शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

अस्तंभा येथे वनभाजी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:10 IST

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग : याहामोगी आदिवासी विकास संस्था व दिव्या महिला ग्रामसंघाचा उपक्रम

नंदुरबार : सातपुडय़ातील अस्तंभा येथे याहामोगी आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था धडगाव व दिव्या महिला ग्रामसंघ अस्तंभा यांच्या संयुक्त विद्यमाने वनभाजी मेळावा घेण्यात आला.प्रारंभी देवमोगरा माता व वनभाजी टोपलीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी बचत गटातील महिला पारंपरिक पद्धतीने बांबूच्या टोपलीत पांढ:या रूमालात रानभाजी-वनभाजी  गुंडाळून डोक्यावर रानभाजी व वनभाजी लिहिलेल्या टोप्या घालून सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी नंदुरबार कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दीपक अहिरे यांनी रानभाज्या व वनभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म, सुगंधी द्रव्ये, जीवनसत्व, क्षार, लोह, कॅल्शीयम असल्याचे सांगितले. या भाज्यांचा आदिवासी समाजातील नवीन पिढीने अभ्यास करून त्यांचा हंगाम कोणता, कंदमुळे व बियाण्यांचे संकलन करून कृषी महाविद्यालयात परीक्षणास आणल्यास त्यांचे जतन व संवर्धन करून  उत्पादन वाढीसाठी आणि त्यांना सुकवून मूल्यवर्धनासाठी प्रय} करता येईल, असे सांगितले.वनभाज्यांचे प्रवर्तक रामसिंग वळवी यांनी या भाज्या परत खाण्यासाठी वापरल्या तर आपली आर्थिक बचत होईल व कुपोषण कमी होण्यास मदत होईल. या भाज्या शहरात विक्रीसाठी प्रय}पूर्वक आणाव्यात व असे मेळावे सातपुडय़ात सर्वत्र भरावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.नंदुरबारचे सहायक उपवनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी महिलांचा सहभाग व विविध प्रकारच्या भाज्यांची पाककला पाहून फारच आनंद झाल्याचे सांगितले. तसेच व्यवस्थापनांतर्गत अशा प्रकारच्या उपक्रमास पाठिंबा दिला जाईल व रोजगार वाढीसाठी आणि जंगल वाढीसाठी सर्वानी सहकार्य करावे. जंगल वाढले तर आणखी वेगवेगळ्या हंगामात येणा:या भाज्या, फळे खाण्यास मिळतील. तसेच आदिवासींच्या या पाककलेचे शहरातील लोकांनी अनुकरण           करावे, असे आहे. शहरात मसालेदार पदार्थ व तेल यामुळे विविध  आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले.शहादा येथील सहायक उपवनसंरक्षक एस.आर. चौधरी यांनी आदिवासी आणि जंगल वेगळे करू शकत नाही. सातपुडय़ातील सर्वात उंच असे अस्तंभा शिखराचे महत्त्व सांगून 55 ते 60 प्रकारच्या वनभाज्या येथे असल्याचे सांगितले. काही भाज्या पावसाळ्यात उगवतात, काही हिवाळ्यात व काही नदीच्या पाण्यात तर काही झाडांवर येतात. त्यामुळे अस्तंभा येथे वनभाज्यांचा खजिना असून, या भाज्यांची अनोखी चव  आहे. या भाज्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी व बचत गटाच्या महिलांनी प्रयत्न करावे. अस्तंभा यात्रेदरम्यान या भाज्यांचे कॅन्टीन चालविण्याचा प्रय} करावा. म्हणजे या भाज्यांची मागणी वाढेल व शहरार्पयत याचा प्रचार होईल. भविष्यात ग्रामस्थांनी अस्तंभा डोंगर वनभाजी व जंगलाने सजविण्यास वनविभागास सहकार्य करावे, असे आवाहन केले.याप्रसंगी अक्राणीचे आर.एफ.ओ. एच.बी. धनगर, बिलगावचे र}पारखी, काकर्दाचे पिंगळे, असलीचे वनपाल लक्ष्मण भोई, नंदुरबार कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्रा.डॉ.व्ही.एस. पाटील, प्रा.आर.एस. बागुल, प्रा.आर.एस. बागुल, राहुल राजपूत आदी उपस्थित होते.मेळाव्यासाठी वंदना पावरा,  रंजना नवेज, विठ्ठल कदम, छगन वसावे, मंगेश नवेज, कविता वसावे, रूषा पाडवी, पार्वती वळवी,                मीना वळवी, सरपंच पोपट वसावे, पोलीस पाटील धिरसिंग वळवी,             रिना वळवी, माधव वळवी,              वनसिंग वळवी, दिव्या महिला ग्राम संघाच्या महिलांनी परिश्रम घेतले. या वेळी राणीकाजल अनुदानित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर.एस. पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.