ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.29- वनविभागाच्या जमिनीवरील झाडे तोडणा:यांना प्रतिबंध केल्याचा राग येवून जमावाने वनमजुरास मारहाण केली तसेच शिविगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना 27 रोजी गंगापूर वनक्षेत्रात घडली. यावेळी जमावाने सागाची अनेक झाडे तोडून नेली.
अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर वनक्षेत्रात 10 ते 15 जण सागाची तसेच इतर झाडे तोडून नेत होती. त्याला वनमजूर माकत्या टेगडय़ा पाडवी यांनी विरोध केला. त्याचा राग येवून जमावाने वनमजूर माकत्या पाडवी यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिविगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जमावाच्या तावडीतून यांनी आपली सुटका केली. यावेळी जमावाने सागवानी झाडे तसेच इतर झाडे तोडून नेली. याबाबत माकत्या पाडवी, रा.गुलीआंबा, ता.अक्कलकुवा यांनी फिर्याद दिल्याने कृष्णा पाडवी, काल्या सोनका यांच्यासह 10 ते 15 जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.