शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाल्हेरी व कुंडलेश्वर विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : निसर्ग सौदर्य अन् सफरीसाठी पर्यटकांना सतत साद घालणा:या तालुक्यातील कुण्डलेश्वर व वाल्हेरी येथील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत शासनाने उदासीन धोरण घेतले असून, या प्रकरणी राज्याचे पर्यटनमंत्री असलेले जिल्ह्याचे पालक मंत्र्यांनी तरी लक्ष घालून निधी उपलब्ध करुण द्यावा अशी पर्यटकांची माफक अपेक्षा आहे.तळोदा शहरापासून अवघे 16 कि.मी. अंतरावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : निसर्ग सौदर्य अन् सफरीसाठी पर्यटकांना सतत साद घालणा:या तालुक्यातील कुण्डलेश्वर व वाल्हेरी येथील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत शासनाने उदासीन धोरण घेतले असून, या प्रकरणी राज्याचे पर्यटनमंत्री असलेले जिल्ह्याचे पालक मंत्र्यांनी तरी लक्ष घालून निधी उपलब्ध करुण द्यावा अशी पर्यटकांची माफक अपेक्षा आहे.तळोदा शहरापासून अवघे 16 कि.मी. अंतरावर सातपुडय़ाच्या पायथ्यालगत कुण्डलेश्वर व वाल्हेरी ही तालुक्यातील दोन प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. येथे सातपुडय़ाची विपूल वन संपत्ती लाभली असल्याने ही स्थळे निसर्गाच्या सानिध्यात आहेत. साहजिकच येथे जिल्ह्याबरोबर जिल्हाबाहेरील पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी नेहमीच येत असतात.कुण्डलेश्वरला प्राचीन महादेवाचे मंदीर आहे. त्यामुळे येथे नेहमी भाविक दर्शना करीता येतात. याशिवाय गरम पाण्याचे दोन कुंड देखील आहेत. या पाण्यात स्नान केल्याने त्वचा रोग बारा होतो, अशी धारणा असल्याने पर्यटक बाराही महीने गर्दी करतात. मात्र येथे रस्त्या सारखी पायभूत सुविधा नसल्याने पर्यटकना अनेक अडचणीना सामना करावा लागत असतो. इच्छागव्हानपासून तेथे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. संपूर्ण खडी उखाडल्यामुळे चालने ही मुश्किल होते. है स्थळ तळोदा वनविभागाच्या  हद्दीत येत असल्याने वनविभाने तेथे विश्राम गृह उभारले आहे. त्याच बरोबर काही ठिकाणी पेवर ब्लॉकच्या सहाय्याने रस्ते तयार केले आहे. काही स्पॉटवरील हे ब्लॉक उखडून तेथील भराव खचला आहे. त्यामुळे हे स्पॉट अत्यंत धोकेदायक बनले आहे. तेथे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नकारता येणार नाही. याकडे वन विभागाने सुध्दा दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. वास्तविक कुण्डलेश्वरला निसर्ग दत्त देणगी लाभली आहे. वन औषधींची विपुल संपत्ती येथे आहे. साहजिकच मोठे निसर्ग स्थळास वाव आहे. मात्र लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रनेने विकासाबाबत उदासीन धोरण घेतले आहे. विशेष म्हणजे येथे कुण्डलेश्वर महादेवाचे प्राचीन  मंदीर आहे. त्यामुळे येथे मकर संक्रातीला मोठी यात्रा भरते. यात्रेच्या दृष्टीने सुध्दा भाविकाना साध्या किरकोल सुविधा नाहीत. एवढेच नव्हे तर जेव्हा गरम पाण्याच्या कुंदात भाविक स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी प्रसाधन गृहात जातात तेव्हा अडचणी येतात. कारण या गृहांची पूर्ण भिंती पडल्या आहेत. त्याची दुरुस्ती होत नाही. पलीकडे जाण्यासाठी केटीवेअर बंधारा बांधला आहे. त्याच्याही पाटय़ा निघाल्या आहेत. त्यादेखील बसविल्या जात नसल्याचे चित्र आहे. एकूणच कुण्डलेश्वर पर्यटन स्थळाच्या विकासासाठी सातत्याने मागणी होत असतांना सर्वानीच याकडे साफ  दुर्लक्ष केले आहे. निदान जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल          यांचाकडे पर्यटन मंत्रालय आहे.            त्यांनी तरी याकडे गांभीर्याने लक्ष घाण्याची मागणी आहे.