शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वैश्य सोनार समाजाचा राज्यस्तरीय स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : संत शिरोमणी नरहरी वैश्य सोनार व सुवर्णकार समाज शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सद्गुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : संत शिरोमणी नरहरी वैश्य सोनार व सुवर्णकार समाज शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सद्गुरु धर्मशाळेच्या आवारात राज्यस्तरीय स्नेहमेळावा रविवारी झाला. मेळाव्याला महाराष्ट्रासह, गुजरात व मध्य प्रदेश येथून समाज बांधव उपस्थित होते.मेळाव्यापूर्वी सकाळी नऊ वाजता संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. संत नरहरी सोनार व गणपती पूजनाने मेळाव्यास प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी अशोक सोनार होते. व्यासपीठावर नंदुरबार जिल्हाध्यक्ष धनसुख सोनार, शहादा उपाध्यक्ष विलास सोनार, तळोदा अध्यक्ष दिलीप सोनार, अक्कलकुवा अध्यक्ष विजय सोनार, दोंडाईचा अध्यक्ष संदीप सोनार, धुळे अध्यक्ष  जमुनदास सोनार, शिरपूर अध्यक्ष राजेंद्र सोनार, जळगाव अध्यक्ष वैभव सोनार, कुकरमुंडा अध्यक्ष सूर्यकांत सोनार, सेलंबा अध्यक्ष सतीशचंद्र सोनार, ब:हाणपूर अध्यक्ष सुभाष सोनी, खेतियाचे अध्यक्ष हितेश सोनी, खापरचे अध्यक्ष विनय सोनी, नाशिकचे अध्यक्ष काशिनाथ सोनी उपस्थित होते. महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करण्यात आले होते. त्यात वैशाली सोनार (नंदुरबार), नंदुरबारच्या नगरसेविका जागृती सोनार, राखी सोनार (शहादा), कोमल सोनार (तळोदा), मनीषा सोनार (अक्कलकुवा), सिमा सोनार (धुळे), राखी सोनार (शिरपूर), साधना सोनार (नाशिक), संध्या सोनार (जळगाव), निकीता सोनार (कुकरमुंडा), छाया सोनार (सुरत), भारती सोनार (दोंडाईचा), सिमा सोनार (सेलंबा), सुलोचना सोनार (ब:हाणपूर), वैशाली सोनार (खापर) उपस्थित होतया.मेळाव्यात उत्कृष्ट  काम करणा:यांना समाजसेवेचा पुरस्कार देण्यात आला. त्यात राजाकाका सोनार (नंदुरबार), प्रदीप सोनार (नंदुरबार), डॉ. लक्ष्मण सोनार, डॉ.मिखिलेश सोनार यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. मेळाव्यात अशोक सोनार म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी रूढीपरंपरेनुसार योग्य परंपरा सुरू ठेवली आहे ती जीवंत ठेवणे महत्वाचे आहे. मात्र काळानुसार पैसा व वेळेची बचत होणेही गरजेचे आहे. लग्नकार्यासाठी लाखो रुपयांचा खर्च न करता कमी खर्चात लग्न करावे. उरलेली रक्कम मुलांना भविष्यात कामात येईल. समाजात लग्न सोहळा हा गोरज मुहूर्तावर असतो. मात्र हे लगA रात्री दहा वाजेर्पयत लागते. त्यामुळे नातेवाईक, समाज बांधव, आप्तेष्टांना घरी पोहोचण्यास उशिर होतो. काहीवेळा घरी परतताना अपघातही झाले आहेत. म्हणून समाज बांधवांनी  लग्न वेळेवर लावावे जेणेकरून लग्नाचा आनंद घेता येईल. सुवर्णकार समाज अल्पसंख्याक आहे तो वाढवण्यासाठी इतर सोनार समाजाशीही ‘बेटी व रोटी’ व्यवहार सुरू झाला आहे. त्यामुळे संख्या वाढेल यात शंका नाही. समाजाने कधीही हुंडा घेतला नाही कधी घेऊ दिलाही जाणार नाही.  मुलींनी लग्नाच्यावेळी ब्युटीपार्लरमध्ये जास्त वेळ लावू नये व वेळेचे भान ठेवावे. तरुणांनीदेखील रात्री नाच-गाणे करुन घ्यावे. लग्नाच्या दिवशी नवरदेवसमोर नाचण्यात वेळ घालवू नये. मुलींना मोबाईल देताना साधा मोबाईल दिला  तर अधिक चांगले. जर अँड्रॉइड मोबाईल दिला तर तर त्याची खात्री करा, असेही त्यांनी सांगितले. तरुणांनीही आपली मते मांडली. प्रास्ताविक विनोद शंकर सोनार यांनी केले. सूत्रसंचालन विवेक सोनार व डॉ.हेमंत सोनार यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रकाशा येथील संत शिरोमणी नरहरी सोनार समाज आणि महिला मंडळ व शहादा येथील वैश्य सुवर्णकार यांनी परिश्रम घेतले.