तालुक्यातील रेवनागर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरण शिबिर घेण्यात आले होते. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी लसीकरण करण्याची आवश्यकता व त्याचे फायदे सोप्या भाषेत समजावून सांगून खोट्या अफवांवर विश्वास करू नये आणि लसीकरण करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
प्रारंभी वयोवृद्ध नागरिक व विधवा महिलेचे लसीकरण करून शिबिराची सुुरुवात करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. लसीकरणात ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदविला. याप्रसंगी सुमारे ५० ग्रामस्थांनी लसीकरणात आपली नोंदणी करून लस घेतली. यावेळी पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, पोलीसपाटील भरत पावरा, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पावरा, आपसिंग पावरा, मुख्याध्यापक हेमंत ठाकरे, आदी उपस्थित होते. शिबिरासाठी डॉ. विशाल चौधरी, डॉ. भरत पावरा, डॉ. महेश ब्राह्मणे, ग्रामसेवक दिलीप खोब्रागडे, शिक्षक मिनेश पावरा, मेरसिंग पावरा, सुकलाल पावरा, दौलत पावरा, खुशाल पावरा, जुहऱ्या पावरा, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.