१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आल्याने या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती आली आहे. राहिलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी कस धरला असून, पुढील नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनावर लस उपलब्ध केल्यानंतर लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. यात शहादा तालुक्याचा दीड लाखाचा टप्पा पार झाला असून, एक लाख ६० हजार ३२० नागरिकांना लसीकरण केल्याचे २३ रोजी नोंदविण्यात आले आहे.
शहादा तालुक्यात झालेले लसीकरण...
१८ ते ४४ वयोगटातील
पहिला डोस ३७ हजार ६५५
दुसरा डोस चार हजार ८९६
४५ वर्षे वयोगटावरील
पहिला डोस सात हजार २६९
दुसरा डोस ३१ हजार ५१८
आरोग्य सेवा कर्मचारी
पहिला डोस तीन हजार ४७०
दुसरा डोस दोन हजार ५३
फ्रंटलाईन वर्कर
पहिला डोस सात हजार ५९०
दुसरा डोस दोन हजार ८६९
एकूण एक लाख ६० हजार ३२०
शहादा तालुक्यात शिल्लक लसी
कोविशिल्ड दोन हजार ५३०
कोव्हॅक्सिन एक हजार ५०
उर्वरित लसीकरणाचे ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत नियोजन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
शहादा तालुक्यात आतापर्यंत कोविड लसीकरणाचा दीड लाखाचा टप्पा पार केला असून, लसीकरण नियोजन पद्धतीने तालुक्यातील आरोग्य कर्मचारी करीत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे. तसेच नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण झाले असून, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस दोन्ही उपयुक्तच आहे. फक्त कोविशिल्ड ही लस ८४ दिवसात घ्यावी लागत असून, कोव्हॅक्सिनचा २८ दिवसात दुसरा डोस घ्यावा लागतो.
- राजेंद्र वळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शहादा