यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, पंचायत समिती सदस्य आपसिंग पाडवी, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी आर. आर. देसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. बडगुजर, केंद्रप्रमुख सुभाष खैरनार, ग्रामसेवक निखिल बाविस्कर, कुकडीपादर, रत्नाकर शेडे, पोलीस पाटील, सरपंच, युनिसेफचे तालुका समन्वयक जितेंद्र वळवी, शुभम शिरसोले उपस्थित होते. तहसीलदार रामजी राठोड व गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी या अतिदुर्गम भागातील शिक्षक, केंद्रप्रमुख आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका यांच्या कार्याचे कौतुक करीत नागरिकांना लसीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यशस्वितेसाठी अंगणवाडी सेविका, सर्व आशा वर्कर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरात रमनोज नाईक, कांतीलाल पावरा, राजेश गावित, सुनील वळवी यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी परिश्रम घेतले.