शिबिराचे उद्घाटन सरपंच मालसिंग वसावे, उपसरपंच रेवा वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गेमजी वसावे, पोलीस पाटील श्रीमती सुवार्ता वळवी, जयसिंग वसावे, केंद्रप्रमुख पंडित एंडाईत, ग्रामसेवक सुनील गावित, तलाठी श्रीमती पी डी कुलकर्णी, डोगेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सचिन वळवी ,मुख्याध्यापक रवींद्र वसावे, अनिल वसावे, नंदकिशोर सोनवणे, उपस्थित होते . शिबिराच्या दरम्यान पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, सहाय्यक गटविकास अधिकारी बि.डी. गोसावी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कोकणी, पंचायत समिती सदस्य चंदूला वसावे यांनी शिबिरास भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधून समाधान व्यक्त केले. लसीकरणाचे फायदे समजावून सांगण्यासाठी गावात जनजागृती करण्यात आली. आरोग्य सहाय्यक आशिष वळवी, प्रल्हाद वानखेडे, परिचारिका निर्मला मावची, योगिता वळवी, सुनंदा गावित,भावना वळवी, भूपेंद्र वळवी ,आशा वर्कर रिबिका वळवी ,गुजरा वसावे ,अंगणवाडी सेविका स्मिता वसावे,शबरी वळवी, प्राथमिक, माध्यमिक व शासकीय आश्रम शाळेचे शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
निजामपुर येथे २०४ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST