शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

दुर्गम भागात सर्पदंशाच्या लसी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

धडगाव : तालुक्यातील विविध भागांत आरोग्य विभागाने सर्पदंशावरील लसींचा पुरवठा करण्याची मागणी आहे. तालुक्यातील काही आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत ...

धडगाव : तालुक्यातील विविध भागांत आरोग्य विभागाने सर्पदंशावरील लसींचा पुरवठा करण्याची मागणी आहे. तालुक्यातील काही आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत लसींचा पुरवठा नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या तालुक्यातील विविध भागांत सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. यातून नागरिकांना उपचारांसाठी लसींची गरज आहे.

सवलत द्यावी

नंदुरबार : शहरातील विविध भागांत चार वाजेनंतर व्यवसाय बंद करण्यात येत आहेत. परंतु यातून बांधकाम कामगार व बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यास वेळ लागत असल्याने त्यांना सवलत देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बाजारात भुईमुगाची आवक थंडावली

नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भुईमुगाची आवक थंडावली आहे. यंदा भुईमुगाला २ हजार ६०० ते ५ हजार २०० रुपयांपर्यंत दर देण्यात आले होते. ओल्या शेंगा २ हजार ७०० ते ४ हजार २०० पर्यंत खरेदी करण्यात आल्या होत्या. कोरड्या शेंगांना ४ हजार २०० ते ५ हजार २०० रुपये दर देण्यात आला होता. नंदुरबार तालुक्यासह नवापूर व तळोदा तालुक्याच्या विविध भागांतून यंदा मालाची आवक झाली होती.

रॅपिड टेस्टवर भर

नंदुरबार : शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये नागरिक रॅपिड ॲंटिजन तसेच आरटीपीसीआर टेस्ट करून घेत आहेत. कोरोना आटोक्यात आला असला तरीही लक्षणे दिसल्यानंतर नागरिक तातडीने केंद्रांवर जाऊन टेस्ट करून घेत असल्याचे दिसून आले आहे. यातून कोरोना नियंत्रणात आहे.

फलकांची वानवा

नंदुरबार : कोळदे ते नंदुरबार दरम्यान रस्त्यावर मार्गदर्शक फलक आणि दोन्ही बाजूने पांढरे पट्टे लावण्याची मागणी आहे. मार्गावर रहदारी पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मार्गाने महामार्गाकडे वाहतूक सुरू आहे.

खड्डे खोदून रस्त्यांची लावली वाट

नंदुरबार : शहरातील विविध भागांत पालिकेने तयार केलेल्या विस्तृत रस्त्यांची नागरिकांकडून वाट लावली गेली आहे. अनेक ठिकाणी चांगल्या रस्त्यांना खोदून नवीन पाइपलाइन टाकणे, दुरुस्ती केली गेली आहे. दरम्यान, आता या रस्त्यांची दुरुस्ती पहिला पाऊस कोसळण्यापूर्वी करण्याची मागणी होत आहे. पावसाच्या पाण्यात हे खड्डे न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गतिरोधकांची गरज

नंदुरबार : सीबी पेट्रोलपंप ते जोगेश्वरी माता मंदिर अंतरात गतिरोधक टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. मार्गाचे विस्तारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गाने वाहतूक वेगाने होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाईची मागणी आहे.

बेशिस्तांची पळापळ

नंदुरबार : पोलीस दलाकडून मास्कचा वापर न करण्यासह, थुंकणारे व दुचाकीवर बेशिस्तपणे वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. यातून पोलीस पथक दिसून आल्यानंतर बेशिस्तांची पळापळ होत असल्याचे चित्र आहे. यात युवकांची संख्या मोठी असल्याची माहिती समाेर आली आहे.

वाळूमुळे समस्या

नंदुरबार : गुजरात राज्यातील कुकरमुंडा आणि निझर तालुक्यात तापी नदीतून अविरत वाळू उपसा सुरू आहे. ही वाळू महाराष्ट्रातील रस्त्यांवरून इतर भागांत नेली जात आहे. दरम्यान, अवजड वाहनांमधून बाहेर पडणारी वाळू नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. यातून किरकोळ अपघात होत आहेत.

नागरिकांची फरफट

नंदुरबार : जिल्ह्यात ठिकठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. यातून ग्रामीण भागात समाधानकारक लसीकरण सुरू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु काही ठिकाणी लस मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक शहरी भागातील ग्रामीण रुग्णालये व लसीकरण केंद्रांत जात आहेत.